शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
2
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
3
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
4
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
7
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
8
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
9
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी
10
सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!
11
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
12
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
13
BSNL ची आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठी भेट; कंपनीने सुरू केली HD कॉलिंग सेवा...
14
पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
15
४० हजार कोटींची संपत्ती असणाऱ्या तरुणाने घेतला सन्यास! ऐशोआरामाच्या जीवनाचा का केला त्याग?
16
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
17
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
18
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
19
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
20
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर

महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप नाकर्त्या राज्य सरकारने केले : अजित पवार

By स. सो. खंडाळकर | Published: September 14, 2022 8:30 PM

या प्रकल्पासाठी तळेगावाजवळ जागा मंजूर करण्यात आली होती. इतर सवलती देण्यात आल्या होत्या.

औरंगाबाद : वेदांत- फाक्सकॉन प्रकल्प राजकीय दबावापोटी व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला गेला, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी घातला. हा करारच झाला नव्हता, असे कुणी म्हणत असतील तर ते धादांत खोटे आहे.

अजित पवार मुंबईहून विमानाने आले. सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर माध्यमांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, सरकारे येतात, जातात. दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यात आम्हाला कुठलेही राजकारण करायचे नाही. वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, हीच आमची इच्छा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जागा सवलती देण्यात आल्या होत्या प्रकल्पासाठी तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने खूप मेहनत घेतली. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही मोलाचे प्रयत्न केले. दीड लाख कामगारांना काम देऊ शकणाऱ्या या प्रकल्पासाठी तळेगावाजवळ जागा मंजूर करण्यात आली होती. इतर सवलती देण्यात आल्या होत्या. तरीही महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात मी पत्र दिले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्राला वस्तुस्थिती सांगावी, असे आव्हान पवार यांनी दिले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार