शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

छत्रपती संभाजीनगरात ड्रेनेज सफाईचा मुद्दा ऐरणीवर;चेंबरमध्ये गुदमरून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

By मुजीब देवणीकर | Published: May 09, 2023 5:13 PM

छत्रपती संभाजीनगर मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशनची यंत्रणाच नाही

छत्रपती संभाजीनगर : सलीम अली सरोवराजवळ ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गुदमरून दोन मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा ड्रेनेज सफाईचा मुद्दा ऐरणीवर आला. शहरात मागील नऊ वर्षांत वेगवेगळ्या घटनांमध्ये १२ मजुरांचा मृत्यू झाला. ड्रेनेज चेंबरमध्ये मजूर अजिबात उतरू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानंतरही कंत्राटदार मजुरांना बेधडक चेंबरमध्ये पाठवितात. मजूरही आपल्या जिवाची पर्वा न करता उतरतात, हे विशेष.

सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिकेचा (क्र. ५५३/२००३) निकाल २०१४ मध्ये लागला. ड्रेनेज चेंबरमध्ये कामगार उतरता कामा नयेत, अशी सक्त ताकीद दिली. एखाद्या घटनेत कोणी मरण पावल्यास दहा लाख रुपये भरपाई द्यावी, घटनेला जबाबदार व्यक्ती, संस्थेवर गुन्हा दाखल करावा, असेही आदेशित केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने कंत्राटदारामार्फत मजूर लावून ड्रेनेज साफ करण्याची पद्धत बंद केली. हळूहळू रॉडिंग मशीन खरेदी करण्यास सुरुवात केली. सध्या ड्रेनेज चोकअप रॉडिंग मशीन, सक्शन मशीनद्वारेच काढण्यात येते. सोमवारी घडलेल्या घटनेशी मनपाचा काहीही संबंध नाही, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम म्हणाले.

शासनाने मागविली होती माहिती२०१३ पासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत किती मजुरांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू झाला, याचा तपशील नगरविकास विभागाने छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि कल्याण डोंबिवली मनपांकडून मागविला होता. या मनपांनी शासनाला अहवालही सादर केला होता.

सुरक्षेचे उपाय नाहीतड्रेनेज चेंबरचे झाकण उघडल्यावर ९९ टक्के कामगार सुरक्षेची साधने वापरत नाहीत. वास्तविक पाहता ऑक्सिजन, विशिष्ट कपडे, ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. प्रत्येक चेंबरमध्ये विषारी वायू साचलेला असतो. तो एवढा उग्र असतो की, कामगाराला काही सेकंदांत भोवळ येऊन तो कोसळतो. गुदमरून दगावतो.

आतापर्यंतच्या घटना-२०१४ मध्ये मुकुंदवाडी गावात विसर्जन विहिरीतील गाळ काढताना विषारी वायूमुळे चार मजुरांचा मृत्यू झाला होता.-२९ ऑगस्ट २०१६ रोजी हडको एन-१२ विसर्जन विहिरीजवळील ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून प्रदीप हरिश्चंद्र घुले (वय २५, रा. शताब्दीनगर) या मजुराचा मृत्यू झाला होता.-१८ मार्च २०१९ रोजी ब्रिजवाडी-पॉवरलूम भागात ड्रेनेज चेंबरमधील पाणी ओढण्यासाठी मोटारी लावल्या. मोटार खराब झाल्याने चेंबरमध्ये उतरलेल्या चारजणांचा मृत्यू झाला होता.- सोमवारी सलीम अली सरोवराजवळ ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून अंकुश थोरात, रावसाहेब घोरपडे यांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूGarbage Disposal Issueकचरा प्रश्न