शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
3
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
4
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
5
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
6
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
7
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
8
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
9
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
10
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
11
वरमाळा पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
12
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
13
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
14
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
15
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
16
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
17
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
18
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
19
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
20
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...

हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट: हरिभाऊ बागडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:24 IST

देशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर : हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी असावी, त्यातूनच होईल भरभराट, असा हितोपदेश गुरुवारी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्योगपतींच्या सन्मान सोहळ्यात केला.

राज्यपाल बागडे म्हणाले, दर्डा परिवार मुळात दोनशे वर्षांपूर्वी राजस्थानाहून आले. आणि यवतमाळला ते कॉटन किंग झाले. तिकडे मी त्यांचे गाव शोधले. तिथल्या सरपंचाशी बोललो. तुला काय पाहिजे ते सांग, असे मी त्याला सांगितले. राजेंद्रबाबूंना तुमच्या मूळ गावी शाळा बांधून द्या, असे मी त्यांना बोललो. त्यास ते तयार झाले आहेत. (टाळ्या) मागे इकडच्या मारवाडी समाजाने सत्कार केला. त्यावेळी त्यांनाही म्हणालो, गावाकडे येत जा. (हशा व टाळ्या) तिथल्या प्रवासी संघटनेचा (राजस्थान सोडून अन्यत्र उद्योगधंदा करणारे) कार्यक्रम झाला. त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगितले, देशभर पांगलेल्या लोकांना गाठा आणि इकडे गुंतवणूक करायला सांगा. (टाळ्या)

मराठवाड्यात अन्यत्र कारखानदारी वाढली नाहीमराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरच्या अवतीभवती औद्योगिक क्षेत्र आहे. मराठवाड्याच्या जिल्ह्याजिल्ह्यांत व छत्रपती संभाजीनगरच्या तालुक्यांमध्ये कारखानदारी वाढलेली नाही. बजाज कारखाना सुरू झाला आणि सहा महिन्यांतच संप सुरू झाला. ते योग्य नव्हते. कारखाना जरा वाढू द्या मग हक्क मागा. हक्कापेक्षा कर्तव्याची रेष मोठी ठेवा. (जोरदार टाळ्या) ना शाळांतून ना कुठून कर्तव्याबद्दलचे प्रशिक्षण झाले नाही.

गावचा विकास म्हणजे भारताचा विकासदेशातल्या सर्व गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. हातांना काम मिळण्याची गरज आहे. पूर्वी ८० ते ९० टक्के लोकांचा व्यवसाय शेतीच होता. गावचा विकास हा भारताचा विकास. गावात काय उद्योग सुरू करता येतील, याचा विचार झाला पाहिजे. मध गोळा करणे व स्वत:चे कपडे स्वत: शिवणे, असे हस्त उद्योग करता आले पाहिजे.

नापीक जमिनीवर उद्योग हवेतराष्ट्राची शेती वाढणार नाही. गावचे शिवारही वाढणार नाही. आता घरांसाठी, उद्योगांसाठी नापीक जमीन वा डोंगरांची जमीन वापरता आली पाहिजे. अन्न देणारी जमीन यात गुंतवता कामा नये, असे माझे मत आहे. आता लोकसंख्या वाढत आहे. ती वाढतच राहणार आहे. अन्नधान्यासाठी जमिनी शिल्लक ठेवाव्या लागतात. नापीक जमिनीवर उद्योग उभारून सरकारने विमानतळापासून सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे.

विकसित भारताचं स्वप्न साकार करा२०४७ साली देश विकसित व्हावा, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. आपण सगळे जण या मानसिकतेत आलो पाहिजे. कोरोना काळात उद्योगपतींना अनेक कर्ज सुविधा दिल्या. मोदी आले तेव्हा देशाचा क्रमांक ११वा होता. आता तो पाचवा आहे. लवकरच तिसरा येईल, अशी अपेक्षा आहे.

उदयपूरला यालोकमत’ सर्वत्र आहे. उदयपूरला या, असे मी म्हटलेय. ‘लोकमत’च्या अनेक बातम्या माझ्या स्मरणात आहेत; पण किसनगडची बातमी व फोटो माझ्या लक्षात आहे. शेजारच्या देशातून आमची जनावरे पळवून नेतात, म्हणून औताला माणसे जुंपावी लागली, अशी ती बातमी होती. ५२ डिग्री तापमानात राहणाऱ्या लोकांना मी जाणीवपूर्वक भेटलो.

टॅग्स :LokmatलोकमतHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajendra Dardaराजेंद्र दर्डाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर