खुलताबाद:- वेरुळ येथील हे १० नंबरचे चैत्यगृह विश्वप्रसिध्द विश्वकर्मा लेणे अथवा सुतार झोपडी म्हणून प्रसिद्ध आहे. वास्तूकलाशास्त्र, स्थापत्यशास्त्र,आणि खगोलशास्त्र या तिन्ही कलामध्ये पारंगत असणा-या स्थपतीने नक्कीच तिनही कलांचा अभ्यास केलेला असावा यांचे कारण म्हणजे मार्च महिन्याच्या १०, आणि ११तारखेला या वेरूळ लेणीला विलक्षण अनुभवाचे साक्षिदार झाले आहेत.
उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होण्याच्या आधिचा काळ असल्यामुळे या काळात सायंकाळच्या वेळी साधारणतः 4.10 ते 5.10 सुमारास सूर्यकिरणे लेणीच्या वरच्या बाजूला असलेल्या गवाक्षातून लेणीत शिरतात . त्यामूळे अंधारलेल्या लेणीतीत तथागत बुद्धाची सुंदर प्रतिमा तेजाने उजळून निघते आणि हा सुंदर तेजाळलेला चेहरा पाहण्यासाठी या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लेणी प्रेमी या क्षणी येथे उपस्थित होते.या वेळी डॉ संजय पाईकराव,सुरज जगताप, डॉ.सचिन बनसोडे, डॉ गौतम पटेकर, विनोद मोरे व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लेणी प्रेमीची उपस्थिती होती.