शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा 

By राम शिनगारे | Published: November 18, 2023 4:52 PM

शिक्षण संस्था सक्षम होतील, विद्यापीठांवरील ताण कमी होईल; उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर

छत्रपती संभाजीनगर : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० नुसार राज्यात समूह विद्यापीठे स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने अनेक महाविद्यालयांना एकत्र येऊन समूह विद्यापीठ (क्लस्टर) स्थापन करता येतील. त्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे शिक्षण संस्था सक्षम होतील. पारंपरिक विद्यापीठांवर संलग्न महाविद्यालयांचा असलेला ताणही कमी होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी 'लोकमत'शी साधलेल्या संवादात दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळाने क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली. वेगवेगळी महाविद्यालये, संस्था एकत्र येऊन क्लस्टर विद्यापीठ स्थापन करणार असतील तर त्यांना ५ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच क्लस्टर विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या संवैधानिक पदांना मान्यता व खर्चाला मंजुरी मंत्रिमंडळाने दिली. याविषयी डॉ. देवळाणकर यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : क्लस्टर विद्यापीठ ही संकल्पना राज्यात लागू करण्यात आली आहे का?उत्तर : हाेय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी मिळाली आहे. राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी केली आहे. त्या धोरणातच क्लस्टर विद्यापीठाविषयी धोरण स्पष्ट केलेले आहे. या धोरणानुसार प्रत्येक शिक्षण संस्था सक्षम झाली पाहिजे. त्या संस्थांनी पदवीचे वाटप करावे. त्यामुळे पारंपरिक विद्यापीठांवर संलग्न महाविद्यालयांमुळे प्रशासकीय व शैक्षणिक कामाचा पडलेला प्रचंड ताण कमी होण्यास मदत होईल. या निर्णयाला राज्यात मोठा प्रतिसाद मिळणार आहे. कारण समाजसुधारकांनी मोठ-मोठ्या शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख आदींचा समावेश आहे. या मोठ्या शिक्षण संस्था क्लस्टर विद्यापीठे स्थापन करतील.

प्रश्न : क्लस्टर विद्यापीठांना सीमारेषा असणार आहे का?उत्तर : क्लस्टर विद्यापीठांना नक्कीच सीमारेषा असणार आहे. त्याविषयीचा अधिकृत शासन निर्णय निघेल. त्यानंतर सीमारेषांविषयी स्पष्टता येईल.

प्रश्न : क्लस्टर विद्यापीठ झाल्यास संबंधित महाविद्यालयांना अनुदान मिळेल का?उत्तर : नक्कीच मिळणार. क्लस्टर विद्यापीठ केल्यास संबंधित महाविद्यालयांच्या अनुदानावर कोणताही परिणाम होणार नाही. शासनाकडून त्यांना नियमानुसार अनुदान कायम मिळणार आहे. हे विद्यापीठ म्हणजे खासगी विद्यापीठ नव्हे. त्यामुळे अनुदानावर कोणताही परिणाम होणार नाही.

प्रश्न : क्लस्टर विद्यापीठाचा राज्याला काय फायदा होईल?उत्तर : पारंपरिक विद्यापीठांवर असलेला ताण कमी होईल. ज्या भागात क्लस्टर विद्यापीठ होईल. त्या संस्थांना स्थानिक रोजगारासाठी आवश्यक असलेले अभ्यासक्रम तयार करता येतील. त्याविषयीच्या निर्णय प्रक्रियेला गती मिळेल. क्लस्टर विद्यापीठांना स्वतंत्र अभ्यास मंडळे, व्यवस्थापन परिषद असेल. त्यात तत्काळ निर्णय होतील. उच्च शिक्षणात गतिमानता येईल.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्र