औरंगाबाद- गणेशोत्सवाची परंपरा संस्कृती जोपासण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. आज श्री गणेश महासंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते संपन्न झाले.
रावसाहेब दानवे यांनी श्री ची विधिवत पूजा व आरती केली उभे राहून ढोल ताशाचा ऐकण्याचा आनंद घेतला. यावेळीमंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे,आ.हरिभाऊ बागडे,आ. प्रदीप जैस्वाल, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता,व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री आमदार यांनी रावसाहेब दानवे आपल्या भाषणात श्रीगणेश महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.