शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

गेल्या विधानसभा निवडणुकीतील युती, आघाड्यांचे चित्र वेगळे; आता पुन्हा डाव मतदारांच्या हाती!

By विकास राऊत | Updated: October 14, 2024 16:24 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय उलथा-पालथी झाल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तीन, तर शिवसेनेच्या सहा जागा मतदारांनी निवडून दिल्या होत्या. शिवसेना-भाजपा युतीने २०१९ सालच्या निवडणुकीला सामोरे गेले होते. परंतु निवडणुकीनंतर युती तुटली. तसेच २०२२ साली शिवसेनेचे दोन गट झाले. उद्धवसेना, शिंदेसेना असे शिवसेनेचे दोन गट झाले. तर २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेसेचे अजित पवार आणि शरदचंद्र पवार, असे दोन गट झाले. मागील पाच वर्षांत राज्यातील राजकारणात झालेल्या भूकंपाचे हादरे जिल्ह्याच्या राजकारणालाही बसले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक राजकीय उलथा-पालथी झाल्या. आता पुन्हा २०२४ च्या विधानसभा निवडणुका समोर असून, डाव मतदारांच्या हाती आहे.

भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार व अजित पवार गट, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम असे मूळ नऊ पक्ष निवडणुकीच्या मैदानात असतील. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना असला, तरी इतर पक्षांचे उमेदवार जिल्ह्याच्या राजकारणाचे समीकरण बदलण्याची तयारी करीत आहेत.

जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ सध्या आहेत. त्यातील ६ जागांवर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आताच्या ठाकरे गटाचे उमेदवार शिवसेना म्हणून निवडून आले. त्यातील पाच आता शिंदेसेनेत आहेत, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून आले होते. जिल्ह्यात सध्या शिंदसेनेकडे पाच, भाजपाकडे तीन तर ठाकरे सेनेकडे १ जागा आहे. नऊपैकी ६ जागांवर ठाकरे सेना, तीनवर भाजप

तीनच उमेदवार होते लाखांच्या पुढे२०१९ साली विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील फक्त तीन उमेदवारांना १ लाखांच्या पुढे मतदान घेता आले होते. यातील राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना १०६१९०, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना १२३३८३, आ. प्रशांत बंब यांना १०७१९३ मते मिळाली होती.

विधानसभा..................... विजयी उमेदवार....................मिळालेली मते .................... तेव्हाचा पक्ष कोणता?औरंगाबाद पूर्व................गृहनिर्माण मंत्री अतुल सावे............. ९३९६६............................भाजपफलंब्री.........................आ. हरिभाऊ बागडे (पद रिक्त).....१०६१९०..............................भाजपसिल्लोड....................पालकमंत्री अब्दुल सत्तार..............१२३३८३.............................शिवसेनाकन्नड.........................आ. उदयसिंग राजपूत..............७९२२५.................................शिवसेनावैजापूर........................आ. रमेश बोरणारे.................९८१८३.............................शिवसेनागंगापूर.............................आ. प्रशांत बंब..............१०७१९३.................................भाजपपैठण..............................खा. संदिपान भुमरे (पद रिक्त).....८३४०३.......................शिवसेनाऔरंगाबाद पश्चिम..............आ. संजय शिरसाट...............८३७९२.............................शिवसेनाऔरंगाबाद मध्य .................आ. प्रदीप जैस्वाल ..........८२२१७................................शिवसेना

जिल्ह्यातील पक्षीय बलाबल असेभाजप : ३शिंदेसेना : ५उद्धवसेना: ०१राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: ००कॉंग्रेस: ००राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार : ००

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी