छत्रपती संभाजीनगर: मराठ्यांना आरक्षण देणारे तेच आणि उडविणारेही तेच आहेत. सरकारनेच १३ टक्के आणि १६ टक्के आरक्षण दिले होते. ते आता टिकले नाही. आता १० टक्के दिलं त्या अगोदर कोर्टात याचिका दाखल केल्या गेल्या. मराठा समाजावर गोड बोलून डाव टाकला असल्याचे दिसते. दरम्यान, मराठा आणि ओबीसी वाद सरकारने लावल्याचा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.
पाच दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खलावल्यानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात ओबीसी नेते पुन्हा एकवटत आहेत, याकडे कसे पाहता या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, कुणाचं काय नियोजन सुरू आहे .मला माहित नाही. पण कोण काय करते हे आमच्या लक्षात आलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी वेगळा प्रवर्ग द्यावा असे म्हटलं आहे याकडे तुम्ही कसे पाहता, त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा भाग, देश स्वतंत्र होण्याआधीपासून मराठा समाजाला आरक्षण आहे. तसेच हे कायदेशीर आहे तरीही आम्हाला आरक्षण मागावं लागते. आमच्या जे हक्काचे आहे, ते आम्हाला मिळावे अशी आमची मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकच असताना आरक्षण मिळत नाही, अशी खंत जरांगे यांनी व्यक्त केली.
२८८ उमेदवार उभे करू...मराठा समाजाला ओबीसीतूच आरक्षण पाहिजे. राज्यसरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणूकीत २८८ उमेदवार उभे करू नाहीतर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडू, असा सज्जड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
आमचे विरोधक भूजबळ आहेलक्ष्मण हाके हे वडिगोद्री येथे मराठा आरक्षणाविरोधात उपोषण करीत आहेत. यावर बोलताना जरांगे म्हणाले, मराठा समाजाचे विरोधक हाके नाही तर मंत्री छगन भुजबळ आहे. मी एकाही धनगर नेत्यांना बोललो नाही. त्यांना विरोधक मानलं नाही. मफलर आडवी टाकून तो तिकडे बसतो आणि वाद लावून देतो, अशा शब्दात त्यांनी भूजबळावंर टिका केली.