शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

निवडणुकीची चाहूल लागताच गहू, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 11, 2024 6:47 PM

लोकसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे; तसेच नवीन धान्याचे बाजाराला वेध लागले आहेत. अशा परिस्थितीत गव्हापाठोपाठ, ज्वारी, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला लागले आहेत. निवडणुकीत महागाईचा मुद्दा आड येऊ नये म्हणून केंद्र सरकारने भाववाढ रोखण्याची पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेत दिसू लागला आहे.

‘भारत ब्रँड’च्या नावाने स्वस्तात विक्रीलोकसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. यामुळे भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत ब्रँड’च्या नावाने स्वस्त धान्य दुकान, तसेच आता माॅलमध्ये आटा, तांदूळ व डाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अजून सरकारी आटा, तांदूळ व डाळ शहरातील मॉलमध्ये विक्रीला आला नाही. मात्र, कमी किमतीत डाळींची विक्री शहरात होत आहे; तसेच सरकारकडे गोदामात मुबलक प्रमाणात धान्य, तांदूळ आहे. परिणामी, मोंढ्यात आटा, तांदूळ, डाळींचे भाव कमी होऊ लागले आहेत.

गव्हाचे उत्पादन विक्रमी होण्याचे संकेतयंदा रब्बी हंगामात देशात ११.४ कोटी टन नवीन गव्हाचे उत्पादन होण्याचा अनुमान आहे. यामुळे तेजीची मानसिकता बदलली व क्विंटलमागे २०० रुपयांनी भाव कमी होऊन २८०० ते ३४५० रुपये दर आहेत. गव्हापाठोपाठ ज्वारीचे भाव ५०० ते ८०० रुपयांनी कमी होऊन शाळू ज्वारी ५००० ते ५५०० रुपये, तर कर्नाटकी ज्वारी ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे.

तांदळातही मंदीयंदा तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. निर्यातीमुळे तांदळाचे भाव वधारले होते. मात्र, सरकारी गोदामातील तांदूळसुद्धा आता कमी किमतीत म्हणजे ३० ते ३५ रुपये किलोने मिळणार आहे. परिणामी, स्थानिक बाजारात तांदळाचे भाव क्विंटलमागे ३०० ते ७०० रुपयांनी कमी होऊन ३६५० ते १० हजार रुपये आहेत.

डाळींत मंदीदिवाळीनंतर पहिल्यांदाच डाळींच्या भावात मंदी आली आहे. हरभरा डाळीच्या भावात १००० रुपयांनी कमी झाले. सध्या ६३०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तुरीची डाळ २५०० रुपयांनी स्वस्त होऊन १२०० ते १२६० रुपये, तसेच ७०० ते ८०० रुपये घसरण होऊन मूगडाळ ९५०० ते १०२०० रुपये किलो, मसूर डाळ ५०० ते ७०० रुपयांनी मंदी येऊन ७५०० ते ८००० रुपये आहे.

आणखी भाव कमी होतीलयंदा ज्वारी, तुरीचे उत्पादन समाधानकारक आहे. त्यात गव्हाचे उत्पादन विक्रमी होत आहे. नवीन तुरीची आवक वाढत आहे. नवीन गहू, ज्वारीची आवक पुढील महिन्यात सुरू होईल. यामुळे भाव कमी होऊ शकतात.- नीलेश सोमाणी,होलसेल व्यापारी

टॅग्स :MarketबाजारAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा