विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टीने बसविण्यात आलेले सोलार बल्ब, बॅटऱ्या, स्पीड बोर्ड, रेडियम, लोखंडी बॅरिकेड्स यांच्या चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. एमएसआरडीसी अधीक्षक अभियंत्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० किमीच्या हद्दीतील चोऱ्यांचे सत्र थांबविण्यासाठी पोलिस आयुक्त, अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. सोलापूर-धुळे महामार्गावरही अशाच चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. एनएचएआयने याबाबत पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत.कशी आहे मोडस ऑपरेंडी?
१० ते २० रुपयांना मिळणाऱ्या हेक्सा ब्लेडने लोखंडी बॅरिकेड्स कापण्यात येतात. हॅण्ड कटरने तार तोडून ती गोळा करून एका टेम्पोमध्ये टाकली जाते. कंपाउंड वॉलच्या पलीकडे टेम्पो उभा असताे. सहा ते सात जणांची टोळी नियोजनबद्धरीत्या चोऱ्या करते. या चाेऱ्यांमुळे अपघाताचा धाेका वतर्वला जात असून चाेरांना तत्काळ अटक करण्याची मागणी चालक करत आहेत.
बॅटऱ्या चोरीमुळे मार्गावर अंधार... बॅटऱ्या चोरीस जात असल्याने महामार्गावर अंधार पडतो. दोन लाखांची एक बॅटरी आहे. सोलार एनर्जी त्यात साठवली जाते. मेघा इंजिनिअरिंगकडे मार्गाची देखभाल व दुरुस्ती चार वर्षांसाठी आहे. त्यामुळे ते चोरीस गेलेले साहित्य बसवतात. परंतु, ते पुन्हा चोरीस जाते. स्पीड किती असावा याचे फलक, लोखंडी बॅरिेकेड्स, रिफ्लेक्टर रेडियम ६० किमीपर्यंत चोरीस गेले आहेत. यामुळे अपघातांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.
चोऱ्या कुठे?वैजापूर आणि गंगापूर परिसरातून गेलेल्या पट्ट्यात सर्वाधिक चोऱ्यांचे प्रमाण आहे. बेंदेवाडी ते सुराळा या पट्ट्यातील महामार्गावर बॉण्ड्री, साइड कंपाउंड वॉल, झाडे तोडणे, साहित्याची चोरी होत असल्याची तक्रार एमएसआरडीसीने पोलिस प्रशासनाकडे केली.
दीड टन संरक्षक जाळ्या चोरीलाकाही महिन्यांपूर्वी दीड किमीपर्यंतच्या लोखंडी संरक्षक जाळ्या चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातून आलेल्या टेम्पोतून पाच ते सहा जण महामार्गावरील संरक्षक जाळ्या कापत होते, अशी माहिती आहे.