शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
3
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
4
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
5
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
6
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
7
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
8
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
9
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
10
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
11
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
12
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
13
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
14
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
15
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
16
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
17
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
18
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
19
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
20
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन

मराठवाड्यात ४० दिवसच पडला पाऊस; २८ तालुक्यांवर दुष्काळी सावट, परतीच्या पावसावर मदार

By विकास राऊत | Published: October 02, 2023 1:10 PM

१५ टक्के पावसाची तूट : हवामान खात्याच्या दृष्टीने पावसाळा संपला

छत्रपती संभाजीनगर : हवामान खात्याच्या दृष्टीने पावसाळा ३० सप्टेंबर रोजी संपला असून चार महिन्यांत मराठवाड्यात ८५.५ टक्के पाऊस झाला आहे. अल निनोचा परिणाम मराठवाड्यातील पावसावर झाला आहे. आठपैकी दोन जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला तर उर्वरित सहा जिल्ह्यांत सामान्यत: सरासरीच्या आसपास पाऊस झाला असून विभागातील ७६ पैकी २८ तालुक्यांत ७५ टक्क्यांच्या आत पाऊस झाला आहे. परिणामी, या तालुक्यांवर दुष्काळी सावट आहे.

मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट ३० सप्टेंबरपर्यंत आहे. ६७९.५ मि.मी. विभागाची वार्षिक सरासरी आहे. त्यापैकी ५८१.५ मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी ११३ टक्के (७६९.७ मि.मी.) पाऊस झाला होता. परतीच्या पावसाचा काळ ४ ऑक्टोबरनंतर सुरू होणार, असे हवामान खात्याचे भाकीत आहे. या काळात पावसाने दमदार हजेरी लावली तर दुष्काळी संकट असलेल्या तालुक्यांची वार्षिक सरासरी पूर्ण होऊ शकेल. विभागातील नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त तर हिंगोली जिल्ह्यात ९३ टक्के पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यांना दमदार पावसाची गरज आहे.

हे तालुके दुष्काळाच्या संकटात....छत्रपती संभाजीनगर, मंठा, घनसावंगी, बीड, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, वडवणी, लातूर, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, शिरूर-अनंतमाळ, जळकोट, धाराशिव, तुळजापूर, भूम, कळंब, वाशी, कंधार, परभणी, पाथरी, जिंतूर, पूर्णा, सोनपेठ, मानवत हे तालुके अजूनही दुष्काळाच्या संकटात आहेत.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय पावसाची तूटजिल्हा......................पावसाची तूटछत्रपती संभाजीनगर....१० टक्केजालना............२० टक्केबीड...........२१ टक्केलातूर..........२८ टक्केधाराशिव............२९ टक्केपरभणी...........३२ टक्केनांदेड...........८ टक्के जास्तहिंगोली...........७ टक्केएकूण............ १५ टक्के

१२२ पैकी सरासरी ४० दिवसच पडला पाऊसमराठवाड्यावर येणाऱ्या काळात दुष्काळाचे सावट आहे. जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत १२२ दिवसांत सरासरी ४० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला. ७ सप्टेंबरपासून पुनरागमन केलेल्या पावसाने विभागाला थोडाफार दिलासा मिळाला.

प्रमुख पिकांच्या उत्पादकतेवर परिणामकापूस, मका, सोयाबीनचे लागवड क्षेत्र अंदाजे ४० लाख हेक्टर असून कमी पावसामुळे या पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.

मोठ्या धरणातील पाणीसाठाप्रकल्प..........२०२२.......२०२३जायकवाडी.... ९९ टक्के....४५ टक्केनिम्म दुधना.....७५ टक्के.....२८ टक्केयेलदरी........१०० टक्के......६२ टक्केसिध्देश्वर....९६ टक्के.......९७ टक्केमाजलगाव....९६ टक्के......१२ टक्केमांजरा.....६४ टक्के.......२८ टक्केपेनगंगा....९९ टक्के.......८३ टक्केमानार....१०० टक्के.......७२ टक्केनिम्न तेरणा.....९८ टक्के......२५ टक्केविष्णुपुरी......९३ टक्के......१०० टक्केसिना कोळेगाव....१०० टक्के....०० टक्केएकूण........९७ टक्के.........५३ टक्के

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी