शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

ड्रेनेज चोकअप शोधणार रोबोट! नवीन तंत्रज्ञानाची छत्रपती संभाजीनगर मनपाकडून चाचपणी

By मुजीब देवणीकर | Published: September 07, 2024 1:15 PM

दिल्ली येथील आणखी एका खासगी कंपनीने अडीच कोटींचे वाहनावरील मशिन विकसित केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील ड्रेनेज लाइन तीन दशकांपूर्वी टाकलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात चोकअप झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानही आता यासंदर्भात बरेच विकसित झाले आहे. एका खासगी कंपनीने शुक्रवारी मनपा अधिकाऱ्यांना रोबोट चोकअप कशा पद्धतीने शोधून देतो, याचे प्रात्यक्षिक दाखविले.

काही वर्षांपूर्वी ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर होत होता. अलीकडेच ड्रेनेजच्या चेंबरमध्ये विषारी वायूमुळे गुदमरून मजुरांचा मृत्यू झाला. या घटना टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांकडून चोकअप काढण्यावर बंदी घातली. मागील काही वर्षांपासून विविध तंत्रज्ञानांच्या मदतीने चोकअप काढले जाते. एका खासगी कंपनीने चोकअप नेमके कोठे आहे, त्याचे थर किती लांबी किती, जमिनीपासून किती खोल, याची इंत्यभूत माहिती देणारे रोबोट विकसित केले. शुक्रवारी सकाळी कंपनीने जुनाबाजार-हेड पोस्ट ऑफीस रोडवर प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह कार्यकारी अभियंता संजय कोंबडे, उपअभियंता संजय चामले आदींची उपस्थिती होती. रोबोट मेनहोलमध्ये सोडल्यानंतर काही क्षणांत जिथे चोकअप होते तेथे पोहोचला. मातीचे किती थर आहे, त्यांची जाडी लांबी रुंदी बाहेर स्क्रिनवर दिली. खोदकाम करायचे असेल, तर जमिनीपासून आत खोली किती हे सुद्धा नमूद होते.

पाण्याचा प्रेशर मारून चाेकअप काढतेदिल्ली येथील आणखी एका खासगी कंपनीने अडीच कोटींचे वाहनावरील मशिन विकसित केले आहे. राज्यातील काही महापालिका चोकअप काढण्यासाठी या मशिनचा वापर करीत आहेत. पाण्याच्या प्रेशरद्वारे चोकअप काढते. गाळ-मलबाही ही मशिन काढून देते. कंपनीच्या प्रतिनिधींनी याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांना दिली. त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी वाहन शहरात आणावे, अशी सूचना करण्यात आली.........

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका