शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

वृद्ध साहित्यिक, कलावंतांची निवड वादाच्या भोवऱ्यात; पाच वर्षांपासून लटकली निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 7:55 PM

नवीन शासननिर्णयानुसार ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन’ योजना राबविणाऱ्या जिल्हास्तरीय समितीची रचनाच बदलून टाकली आहे.

छत्रपती संभाजीनगर : वृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविण्याची जबाबदारी जि.प. समाजकल्याण विभागाऐवजी आता पंचायत विभागाकडे सोपविल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकतर गेल्या पाच वर्षांपासून कलावंतांच्या निवडी रखडल्या आहेत. दुसरीकडे आता योजना राबविण्याचा वाद निर्माण झाल्यामुळे ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’ अशी योजनेची गत झाली.

नवीन शासननिर्णयानुसार ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन’ योजना राबविणाऱ्या जिल्हास्तरीय समितीची रचनाच बदलून टाकली आहे. पूर्वी ही योजना जि.प. समाज कल्याण विभागाकडे होती. ती आता जि.प. पंचायत विभागाकडे सोपविली आहे. त्यास महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने राज्यस्तरावर विरोध केला. संघटनेचे म्हणणे आहे की, या योजनेत शहरी आणि ग्रामीण लाभार्थी आहेत. त्यामुळे ऑनलाइन अर्जाची पडताळणी करणे, अर्जात त्रुटी निघाल्यास संबंधितांना बोलाविणे, दरवर्षी हयातीसंदर्भात सत्यता पडताळणे, खात्यात जमा रकमेची पडताळणी करण्यासाठी या विभागाकडे शहरी भागात यंत्रणा नाही.

अगोदरच पंचायत विभागाकडे कामाचा मोठा भार आहे. राज्यभरात सारखीच अवस्था आहे. ही योजना राबविण्यासाठी शासनाने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले असते तर अडचण आली नसती. त्यामुळे संघटनेने ही योजना राबविण्यास नकार दिला आहे. आता ऑनलाइन पोर्टल सुरू झाले आहे. पण, मूळ कागदपत्रे अपलोड करायचे की पंचायत विभागात जमा करायचे, या बद्दलही संदिग्धता आहे. पूर्वी निवड समितीचे अध्यक्ष- उपाध्यक्ष हे पालकमंत्र्यांनी नियुक्त केलेले अशासकीय सदस्य होते. आता समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी, तर आता पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिव असणार आहेत. अगोदर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सचिव होते.

लाभार्थ्यांची निवड रखडलेलीआता ५ हजारांचे मानधन या योजनेसाठी मागील ५ वर्षांपासून लाभार्थ्यांची निवड रखडलेली आहे. आता नवीन शासननिर्णयानुसार १५ वर्षे कला व साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या कलावंत आणि साहित्यिकांना ५ हजाराचे मानधन दिले जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८०० जण या योजनेचे लाभार्थी असून वर्षाला १०० लाभार्थी निवडण्याच्या सूचना आहेत. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून न दिल्यामुळे पूर्वीप्रमाणेच ही योजना समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात यावी, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे.- डॉ. ओमप्रसाद रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पंचायत विभाग. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदartकला