शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

क्रांती चौक घोषणांनी दणाणला; शिंदे गट-ठाकरे गट भिडणार तोच पोलिसांनी केली 'एंट्री'

By विकास राऊत | Published: January 11, 2024 2:29 PM

दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेची असल्याचा व १६ आमदारांना पात्र केल्याच्या निकालाचे शहरात पडसाद उमटले. क्रांती चौकात रात्री आठ वाजेच्या सुमारास शिंदे गटाचा जल्लोष आणि ठाकरे गटाचे निषेधाचे चित्र पाहायला मिळाले. दोन्ही गट आमने-सामने येऊन भिडणार तोच पोलिसांनी मध्यस्थी करीत ठाकरे गट युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे तणाव निवळला व पुढील अनर्थ टळला.

शिंदे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे होर्डिंग्ज हाती घेत घोषणाबाजीसह जल्लोष केला तर ठाकरे गट युवासेनेने आम्ही सदैव ठाकरेंसोबत असे बॅनर झळकावून शिंदे गटाच्या विरोधात घोषणा दिल्या. दोन्ही गटांतील हे द्वंद्व लवकर संपेल, असे काही वाटत नव्हते. एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीमुळे दोन्हीकडील कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर येऊन राडा होण्याचे चित्र होते. पोलिसांनी तातडीने धाव घेत ठाकरे गट युवासेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे, ऋषी खैरे, धर्मराज दानवे, सागर खरगे, अजय चोपडे, सागर वाघचौरे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांना ताब्यात घेतले. शिंदे गटाचे आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शिल्पाराणी वाडकर आदींनी भगवे ध्वज हाती घेत जल्लोष केला.

युवा सैनिकांनी लढविला किल्लाशिवसेना ठाकरे गटातील फादर बॉडीतील एखाद-दुसरा वगळता कुणीही शिंदे गटासमोर आले नाही. युवा सेनेने शिंदे यांच्या नेतृत्वात तातडीने क्रांती चौकात शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

आम्ही सत्यासोबतचआज खोटेपणाचा विजय झाला असला तरी तो खूप काळ टिकणार नाही. आम्ही खरे आणि सत्य आहोत. याला काळासह जनतेच्या दरबारात उत्तर नक्की मिळेल.-हनुमान शिंदे, जिल्हाप्रमुख ठाकरे गट, युवासेना

शिवसैनिकांच्या मनातील निकालशिवसैनिकांनी राज्यभर आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यांच्या मनातील निकाल लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत राहून हा निकाल आहे.-प्रदीप जैस्वाल, आमदार, शिंदे गट

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना