शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
6
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
7
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
8
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
9
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
10
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
11
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
12
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
13
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
14
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
15
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
16
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
17
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
18
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
19
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
20
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल

बहिणीने पळून जाऊन लग्न केले, भावाने भररस्त्यात मेव्हण्याला कुऱ्हाडीने तोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:53 PM

बहिणीच्या पतीचा खून करून आरोपीने कुऱ्हाड हवेत फिरवत केला जल्लोष

गंगापूर (औरंगाबाद): आपल्या बहिणीसोबत पळून जाऊन  विवाह केल्याचा राग मनात धरून नवऱ्यावर भर रस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर दहेगाव बंगला येथे गुरुवारी (२९) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. बापू छबू खिल्लारे (३४) असे मृताचे नाव आहे. दिवसा ढवळ्या महामार्गावर घडलेल्या खुनाच्या ' सैराट ' घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी वाळूज पोलिसांनी दोनच तासातच सचिन श्यामराव नाटकर (२४) रा.भोकर ता.श्रीरामपूर या आरोपी ' प्रिन्स ' च्या मुसक्या आवळल्या.   

याविषयी अधिक माहिती अशी की मृत बापू खिल्लारे याने आरोपी सचिन नाटकर याच्या बहिणीसोबत काही वर्षा पूर्वी पळून जाऊन आंतरजातीय प्रेम विवाह केला होता; विवाहनंतर त्यां दोघांना एक मुलगा झाला मात्र काही महिन्यातच तो आजारपणाने मृत झाला यादरम्यान मृत बापूचे आपल्या पत्नी सोबत बिनसले तेव्हा पासून ती आपल्या पती पासून वेगळी राहत होती; तर बापू आपल्या भावासोबत त्याच्या सासरवडीला सांरगपुर ता.गंगापूर येथे मागील दोन महिन्यांपासून राहून हुरडा विकण्याचा व्यवसाय करीत होता.बापू मुळेच आपल्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले हा राग मनात ठेवून आरोपी सचिनने बापूला गाठले व कुऱ्हाडीचा घाव घालून संपविले   

खून करून आरोपीने केला जल्लोषआरोपी सचिन नाटकर हा गुरुवारी दुपारी श्रीरामपूर येथून विना क्रमांकाच्या दुचाकीवर जॅकेट घालून जॅकेट मागे कुऱ्हाड लपून आला होता; देहेगाव बंगला येथे मृत बापू दुपारी साडे चारचा सुमारास एका हॉटेल मधून चहा घेऊन बाहेर येताच त्या ठिकाणी पाळत ठेवून बसलेल्या सचिनने जॅकेट मध्ये लपवलेली कुऱ्हाड काढून बापूला गाठले यावेळी आपल्यावर अचानक हल्ला झाल्याने बापूला काही समजण्याच्या आतच आरोपी सचिनने भर रस्त्यावर त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले मृत बापूच्या हाताला अगोदरच जखम झालेली असल्याने त्याच्या हाताला प्लॅस्टर होते त्यामुळे त्याला स्वतःचा बचाव करता आला नाही व त्याला पळता देखील आले नाही त्यामुळे तो रस्त्यावर कोसळला व मला वाचवा असा आरडा ओरडा करू लागला मात्र तोपर्यंत आरोपीने त्याच्या छातीवर मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले व काही काळ भर रस्त्यात कुऱ्हाड हवेत फिरवून जल्लोष केला व दुचाकीवरून फरार झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती वाळूज पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल केला

काही तासातच आरोपी ' प्रिन्स ' ला ठोकल्या बेड्या याप्रकरणी वाळूज पोलिसांनी अवघ्या दोनच तासात गतीने चक्र फिरवून आरोपीला नेवासा परिसरातून ताब्यात घेतले; त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड कोठे टाकली याचा शोध वाळूज पोलिस रात्री उशिरा पर्यंत घेत आहे अशी माहिती पोनि सचिन इंगोले यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू