शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचा देवेंद्र फडणवीसांना 'कानमंत्र'; मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट
2
Arvind Kejriwal : "महिलांना दरमहा १ हजार रुपये, निवडणुकीनंतर २१००..."; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा
3
हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...
4
अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान
5
"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
6
डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, पण आशा सोडली नाही; ४ महिन्यांत क्रॅक केली UPSC, झाली IAS
7
Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा
8
Ajit Pawar :- वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचं सूचक विधान
9
आधी लेग ब्रेक, मग पकडला वेग! नेट्समध्ये अगदी नेटानं गोलंदाजी करताना दिसला बुमराह (VIDEO)
10
शुक्र-शनी युती: ७ राशींना अपार लाभ, नवीन नोकरीची ऑफर; शेअर बाजारात नफा, वरदान काळ!
11
'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
12
BLOG: हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी
13
आईची हत्या, ६ दिवस मृतदेह घरात, वडील येताच...; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने सर्वांनाच मोठा धक्का
14
दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण
15
"माझा पगार काढून घ्यायचा, दारू पिऊन मला मारायचा"; अतुल सुभाषवर पत्नीने केले होते गंभीर आरोप
16
Emerald Tyre Manufacturers : पहिल्याच दिवशी १००% चा रिटर्न, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१८९ वर आला भाव
17
"बेकायदेशीर असतं तर नकार...", सोनाक्षीच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉकिंग प्रतिक्रिया
18
Elon Musk Networth : आता ५०० पारची घोषणा? इलॉन मस्क यांनी रचला इतिहास, असा पराक्रम करणारा जगातील पहिला व्यक्ती
19
३ वर्षांत १७०० टक्क्यांचा रिटर्न, आता 'या' डिफेन्स कंपनीचा स्टॉक २ भागांत स्प्लिट होणार, रेकॉर्ड डेट कधी?
20
राजगडाची थीम अन् पारंपरिक पेहराव, मायरा वायकूळच्या भावाचं बारसं; काय ठेवलं नाव?

आईचा सांभाळ न करणाऱ्या बापाचा मुलाने केला खून; वेरूळ येथील घटनेचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2024 7:45 PM

पोलिस चौकशीत आरोपीने दिली कबुली

खुलताबाद : कुटुंबियांचा सांभाळ करत नसल्याच्या कारणावरून तालुक्यातील तिसगाव तांडा येथील एका व्यक्तीचा त्याच्या मुलाने गळा आवळून खून केल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली. शांतीलाल कोमा राठोड (५०, रा. तिसगाव तांडा) असे मृताचे नाव असून मुलगा धीरज (२७, रा. गिरनेरतांडा, ता. छत्रपती संभाजीनगर) हा आरोपी आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर-धुळे महामार्गावरील वेरूळ येथील उड्डाणपुलाखाली शांतीलाल कोमा राठोड यांचा मृतदेह २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आढळला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेला. त्यानंतर खुलताबाद ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, धीरज हा वडिलाच्या अंत्यविधीला आला असता पोलिसांना त्याच्याविषयी संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी पोलिसांनी धीरजला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. याप्रकरणी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने पित्याचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यास बुधवारी खुलताबाद येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बाप राहत होता कुटुंबापासून वेगळामृत शांतीलाल राठोड यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. शांतीलाल यांचे काही कारणावरून पत्नी व मुलासोबत पटत नव्हते. त्यामुळे शांतीलाल हे तिसगाव तांडा येथे एकटे राहत होते. तर मुलगा धीरज व त्याची आई गिरनेर तांडा येथे राहत होते. बाप आईसह मुलाला सांभाळत नसल्याने धीरजला बापाविषयी मनात चीड येत होती. यावरून बापाचा गळा आवळून खून केल्याची कबुली धीरजने पाेलिसांना दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी