शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येत पार पडला भव्य दीपोत्सव, एकाचवेळी २५ लाख दिवे प्रज्वलित झाले, गिनीज बुकमध्ये झाली नोंद
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शिवसेनेचं नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडेच असायला हवं होतं'; अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
5
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
6
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
7
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
8
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
9
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
10
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

महापालिकेत एक फाइल फिरते ४० टेबलांवरून; फाइलींचे ‘टप्पे’ अन् ‘टक्के’ होणार कमी!

By मुजीब देवणीकर | Published: May 16, 2023 2:26 PM

विकासकामांची एक फाइल फिरते ४० टेबलांवरून

छत्रपती संभाजीनगर : शहराचे सरकार अशी ओळख असलेल्या महापालिका प्रशासनाने आपल्या कामकाजात आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. येथे विकासकामांची एक फाइल तब्बल ४० टेबलांवरून फिरते. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी वाट पाहावी लागते. फाइलींचे ‘टप्पे’ आणि ‘टक्के’ कसे कमी करता येतील, यादृष्टीने प्रशासनाने काम सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागरिकांची कामे लवकरात लवकर व्हावीत, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे.

शहरातील १८ लाख नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. नागरिकांना सोयीसुविधा देताना बोगस कामे, बिले मंजूर होऊ नयेत यासाठी प्रशासनाने प्रत्येक फाइलचा प्रवास थोडा लांबलचक ठेवला. वर्षानुवर्षे याच पद्धतीने अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार काम करीत आहेत. एका विकासकामाचे अंदाजपत्रक तयार होऊन काम पूर्ण होईपर्यंत जवळपास २० टेबलांवर मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. काम झाल्यानंतर पुन्हा त्याच २० टेबलांवरून बिल न्यावे लागते. नवनियुक्त प्रशासकांनी मागील आठवड्यात कामकाजाचा आढावा घेतला. त्यात फाइलींचा प्रवास कसा होतो हे त्यांच्या निदर्शनास आले. फाइलींचे ‘टप्पे’ कमी झाले तर आपोआप ‘टक्के’ही कमी होतात. बिल मंजुरीसाठी प्रत्येक टेबलवर ‘टक्का’ द्यावाच लागतो. त्यादृष्टीने काही तज्ज्ञ अधिकारी कामाची पद्धत बदलण्यासाठी अभ्यास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कामाच्या मंजुरीचा प्रवासकनिष्ठ अभियंता कामाचे अंदाजपत्रक तयार करतो. उपअभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, तांत्रिक कक्ष, अतिरिक्त आयुक्त, १५ लाखांपेक्षा मोठे काम असेल तर आयुक्तांची मंजुरी आवश्यक आहे. त्यानंतर ई-निविदा प्रसिद्धी, पात्र कंत्राटदाराची निवड करण्यासाठी वॉर्ड लिपिक, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, अतिरिक्त आयुक्त आणि १५ लाखांपेक्षा मोठे काम असल्यास आयुक्तांची सही.

काम झाल्यानंतरचा प्रवासविकासकामांचे बिल मंजूर करण्यासाठी लिपिक, कनिठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा लिपिक, लेखाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, तांत्रिक कक्ष, अतिरिक्त आयुक्त आणि गरज असेल तर आयुक्तांची सही आवश्यक आहे.

दरवर्षी २०० कोटींची कामेमहापालिकेच्या निधीतून दरवर्षी २०० कोटी रुपयांची छोटी-मोठी विकासकामे शहरात करण्यात येतात. विविध शासन योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वेगळी कामे करण्यात येतात.

अत्यावश्यक कामांची अडचणमहापालिकेच्या या पद्धतीमुळे अत्यावश्यक कामे खोळंबतात. ड्रेनेज लाइन बदलणे, दूषित पाणीपुरवठा, पॅचवर्क, औषध खरेदी आदी अनेक ठिकाणी मंजुरीशिवाय कामच करता येत नाही. आणीबाणी कायद्याचा बराच दुरुपयोग झाल्याने सध्या त्यानुसारही कामे बंद आहेत.

काय म्हणाले तज्ज्ञ?कामनिहाय अर्थसंकल्पात विकासकामांची तरतूद केली तर लेखा विभागाला फाइल जाणारच नाही. काही टप्पे आणखी सहजपणे कमी करता येऊ शकतात. काम अतिरिक्त झाले तर मंजुरीसाठी लेखा विभागात फाइल गेली पाहिजे. कामाची पद्धतच चुकीची आहे. विकासकामांसाठी स्वतंत्र लेखा विभाग असायला हवा.- सी. एस. सोनी, निवृत्त शहर अभियंता, मनपा

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका