शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू

By बापू सोळुंके | Published: June 22, 2023 1:21 PM

वाळूमाफियांनी ‘साखळी’ करून १६० वाळूपट्ट्यातील वाळू उचलून डेपोपर्यंत नेण्यासाठी निविदाच भरल्या नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : सामान्यांना घर बांधण्यासाठी स्वस्त वाळू मिळावी यासाठी शासनाने नवे वाळू धोरण आणले. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील विविध वाळूपट्ट्यांतील वाळू उपसा करून डेपोवर आणण्यासाठी शासनाला प्रति ब्रास १,६६५ रुपये खर्च येतो. हीच वाळू सामान्यांना ६०० रुपये प्रति ब्रास या दराने शासनाकडून मिळते. म्हणजे शासन १,१६५ रुपये प्रति ब्रास रुपये पदरमोड करून सामान्यांना वाळू देत आहे. मराठवाड्यातील १८८ वाळूपट्ट्यांतील ११ लाख ६६ हजार ३९९ ब्रास वाळू उपसा करून डेपाेवर आणण्याचे उद्दिष्ट होते.

वाळूमाफियांनी ‘साखळी’ करून १६० वाळूपट्ट्यातील वाळू उचलून डेपोपर्यंत नेण्यासाठी निविदाच भरल्या नाहीत. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील २८ वाळूपट्ट्यांसाठी १४ वाळू डेपो तयार करण्यासाठी प्रशासनाला ठेकेदार मिळाले होते. या ठेकेदारांना ९ जूनपर्यंत २ लाख २ हजार ३७७ ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र ९ जूनपर्यंत केवळ २५ टक्के अर्थात ५२ हजार ४४५ ब्रास वाळू उपसा केली. आता पावसाळा सुरू झाल्याने शासनाच्या नियमानुसार नदीपात्रातून वाळू उपसा करता येत नाही.

गौणखनिजातून यंदा ५०९ कोटी ६० लाखांच्या महसुलाचे उद्दिष्टदरवर्षीप्रमाणे यंदाही वाळू, खडी, डबर आणि मुरूम आदी गौण खनिज विक्रीतून मराठवाड्यातून ५०९ कोटी ६० लाख रुपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट शासनाने विभागीय आयुक्तांना दिले आहे. मागील तीन महिन्यांत आतापर्यंत ६८ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल गौण खनिजातून मिळाला आहे. नव्या वाळू धोरणामुळे सर्वसामान्यांना ६०० रुपये ब्रास दराने वाळू उपलब्ध करण्यात आल्याने शासनाकडून मिळालेले उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :sandवाळूAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग