शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

फक्त विकासाचा नारा! राज्य सरकारला १२ वर्षांपासून मानव विकास निर्देशांक काढण्याचा विसर

By स. सो. खंडाळकर | Published: August 10, 2024 11:50 AM

२०१२ पासून निर्देशांकाचा पत्ताच नसल्याने त्याचा विकास कामांवर व प्रगतीवर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील जिल्हावार मानव विकास निर्देशांक काढण्याचा सरकारला जणू विसरच पडला आहे. २०१२ पासून गरज असतानाही हा निर्देशांक का काढला जात नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१२ पासून निर्देशांकाचा पत्ताच नसल्याने त्याचा विकास कामांवर व प्रगतीवर परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मानव विकास निर्देशांक काढण्याचे काम पुण्याची यशदा संस्था करीत असते. यासंदर्भात तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला असे कोणतेच आदेश नाहीत. त्यामुळे मानव विकास निर्देशांक काढण्याचा प्रश्नच नाही.

पूर्णवेळ आयएएस अधिकारीच नाहीदरम्यान, छत्रपती संभाजीनगरातील राज्यातील १२५ तालुक्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनला पूर्णवेळ आयएएस अधिकारी नसल्यामुळे कामावर विपरीत परिणाम होत आहे. तेथे फक्त अधिकारी व कर्मचारी मिळून दहा जण काम करीत आहेत. २०११ पासून हे मिशन अस्तित्वात आले. विभागीय आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यानंतर कृष्णा भोगे व भास्कर मुंडे यांनी तेथे आयुक्त म्हणून चांगले काम केले. आता निवृत्तीपर्यंत मधुकरराजे अर्दड यांच्याकडे तिथल्या आयुक्तपदाचे प्रभारीपद होते. मध्यंतरी नितीन पाटील नावाचे आयएएस अधिकारी पूर्णवेळ काम पाहत होते. पण आठ महिने काम पाहून तेही येथून गेले. आता नवे आयुक्त दिलीप गाढवे यांच्याकडे पदभार यायला हवा होता. परंतु तोही तांत्रिक कारणामुळे त्यांना मिळालेला नाही.

स्थलांतरणाचा धोकामानव विकास मिशन दरवर्षी राज्याच्या नियोजन खात्याकडे निधीची मागणी करीत असतो. सुमारे ८०० कोटींहून अधिकच्या निधीपैकी मुलींसाठी ९४ बस खरेदीसाठी ६७ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. अन्य निधीची प्रतीक्षा सुरू आहे. निधी नसल्यामुळे मानव मिशन संचालित विविध योजना राबविताना अडचणी येत आहेत. काही योजना बंदही झाल्या आहेत. दरम्यान हे मानव विकास मिशन छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला कधीही स्थलांतरित होऊ शकते अशी स्थिती आहे. एकीकडे अशी परिस्थिती तर दुसरीकडे मानव विकास निर्देशांक काढण्यासाठी कुठलीच हालचाल नाही, याचा अर्थ काय घ्यायचा अशी चर्चा सुरू आहे.

२०११ चा जिल्हावार मानव विकास निर्देशांक असा आहे१) नंदुरबार- ०.६०४, २) गडचिरोली- ०.६०८,३) वाशिम- ०.६४८,४) उस्मानाबाद- ०.६४९,५) नांदेड- ०.६५७, ६) जालना- ०.६६३, ७) लातूर- ०.६६३,८) धुळे- ०.६७१, ९) बीड- ०.६७८, १०) परभणी- ०.६७८, ११) बुलढाणा- ०.६८३, १२) यवतमाळ- ०.७००, १३) गोंदिया- ०.७०१, १४) अमरावती- ०.७०१, १५) भंडारा- ०.७१८, १६) चंद्रपूर- ०.७१८, १७) अहमदनगर- ०.७२०, १८) अकोला- ०.७२२, १९)वर्धा- ०.७२३, २०)जळगाव- ०.७२३, २१) छत्रपती संभाजीनगर- ०.७२७, २२) सोलापूर- ०.७२८, २३) रत्नागिरी- ०.७३२, २४) सातारा- ०.७४२, २५) सांगली- ०.७४२, २६) नाशिक- ०.७४६, २७)सिंधुदुर्ग-०. ७५३, २८) रायगड- ०. ७५३, २९) कोल्हापूर- ०.७७०, ३०) नागपूर-०.७८६, ३१) ठाणे- ०.८००, ३२) पुणे-०.८१४, ३३) मुंबई- ०. ८४१ व महाराष्ट्र- ०.७५२

मानव विकास निर्देशांक म्हणजे काय? नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन आणि पाकिस्तानी अर्थतज्ज्ञ मेहबूब उल हक यांनी सन १९९०मध्ये पहिला मानवी विकास अहवाल (एचडीआर) सादर केला. ‘नागरिक हेच देशाची खरी संपत्ती आहेत,’... हे पहिल्याच अहवालाच्या प्रारंभी लिहिलेले वाक्य अहवालाचे सार कथन करते. त्यामुळेच देशांची प्रगती फक्त आर्थिक प्रगतीसारख्या पारंपरिक कसोट्यांवर न मोजता तेथील नागरिकांच्या स्थितीचाही आढावा या अहवालात घेण्यात येऊ लागला आणि विविध देशांची क्रमवारीही तयार होऊ लागली. नागरिकांचे शिक्षण, आरोग्य, समानता, रोजगार, सर्जनशीलता आणि मुलभूत गरजा आदींच्या कसोट्या त्यासाठी लावण्यात येतात. जगात विकासाच्या केंद्रस्थानी कोणते देश किंवा विभाग आहेत, आणि विविध देशांतील नागरिकांचे जीवनमान कुठल्या स्तराचे आहे, हे या अहवालातून मांडले जाते.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocialसामाजिकState Governmentराज्य सरकार