छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसांपासून शहर व परिसरावर सूर्य कोपला आहे. रविवारी शहर व परिसराचे कमाल तापमान ४०.२ अंशांवर पाेहोचले हाेते. सोमवारी ४१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तर आज मंगळवारी पारा ४१.६ अंश सेल्सिअसवर पोहचला. आजचे किमान तापमान देखील २६.२ अंश सेल्सिअस असे नोंद झाले. शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंशांवर पोहचल्याने उष्णतेच्या असह्य झळाने नागरिकांचे हाल झाले.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून पुढील दाेन दिवस उष्णतेची लाट असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये साेमवारी एका अंशाची वाढ हाेत तापमान ४१ अंशावर पाेहोचले, जे सरासरीपेक्षा ५ अंशाने अधिक आहे. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने सोमवारी घेतली. दरम्यान, आज ४१. ६ अंशाची नोंद झाल्याने नवा विक्रम झाला आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य होते. तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मागील चार वर्षांतील एप्रिलमधील तापमानवर्ष.................सरासरी कमाल तापमान२०२१.............३८ अंश सेल्सिअस२०२२.............४१ अंश सेल्सिअस२०२३.............३७ अंश सेल्सिअस२०२४.............३८ अंश सेल्सिअस
एप्रिलमध्ये वाढलेले तापमानतारीख- कमाल-किमान५ एप्रिल - ३९.४ -२२.६६ एप्रिल - ४०.२ -२३.३७ एप्रिल- ४१.०- २४.१८ एप्रिल- ४१.६- २६.२