शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

शस्त्रक्रिया अंडकोशाची, पण चिमुकल्याच्या जांघेत सुई सापडल्याने डाॅक्टर थक्क

By संतोष हिरेमठ | Published: May 20, 2024 2:46 PM

२ वर्षांच्या मुलाची वेदनेतून मुक्तता, पण सुई तिथे गेली कशी ? जाणूनबुजून टोचल्याची शक्यता ?

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांच्या मुलाचा उजवा अंडकोश पोटात होता. यावर शस्त्रक्रिया करताना डाॅक्टरांना जांघेत ३ सें.मी. लांबीची सुई असल्याचे आढळले. शस्त्रक्रियेबरोबर डाॅक्टरांनी जांघेत अडकलेली सुई काढून मुलाची वेदनेतून मुक्तता केली.

या मुलाचा उजवा अंडकोश पोटात होता. यामुळे गंभीर परिस्थिती होती. यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यानुसार ते शस्त्रक्रियेसाठी चिमुकल्याला घेऊन शहरातील तोतला हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले. याठिकाणी मुलावर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. वरिष्ठ पेडियाट्रिक सर्जन डाॅ. आर. जे. तोतला, वरिष्ठ मूत्ररोगतज्ज्ञ डाॅ. मार्तंड पाटील, पेडियाट्रिक भूलतज्ज्ञ डाॅ. श्रीगोपाल भट्टड यांनी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान मुलाच्या जांघेत काही तरी तीक्ष्ण वस्तू असल्याचे डाॅक्टरांना जाणवले. तपासणीअंती मज्जातंतूच्या खोलवर सुमारे ३ सें.मी. लांबीची सुई असल्याचे स्पष्ट असल्याचे स्पष्ट झाले. डाॅक्टरांनी तातडीने ही सुई काढली.

शिलाई मशीनची सुईमुलाच्या शरीरातून काढलेली सुई ही शिलाई मशीनची आहे. तीही गंजलेली होती, असे डाॅक्टरांनी सांगितले. दोन वर्षांच्या मुलाच्या जांघेत सापडलेली सुई पाहून आम्हीही थक्क झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

जाणूनबुजून टोचली?मुलाला कोणीतरी जाणूनबुजून ही सुई टोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली. मात्र, त्यासंदर्भात कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे सुई शरीरात गेली कशी, हा प्रश्न अनुत्तरित राहिला.

वयाच्या दीड महिन्यापासून त्रासमुलगा दीड महिन्याचा असल्यापासून त्याला विशिष्ट स्थितीत त्रास होत होता. त्यामुळे मुलाला काही तरी त्रास होत असल्याची, शरीरात काही तरी असल्याचे वाटत असल्याचे मुलाच्या आईने डाॅक्टरांना सांगितले.

पालकांनी काळजी घ्यावीशरीरातील संवेदनशील अशा जागेत धारदार सुई अनेक दिवस असूनही मुलाला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. ‘जाको राखे साईयां मार सके ना कोई’ असेच म्हणावे लागेल. असा प्रकार टाळण्यासाठी पालकांनी मुलांची अधिक काळजी घेतली पाहिजे.- डाॅ. आर. जे. तोतला, वरिष्ठ पेडियाट्रिक सर्जन

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद