छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाला वाळू माफिया, मुरूम, दगड, मातीची चोरटी वाहतूक करणारे डोईजड झाले आहेत. तहसीलच्या आवारातून वाहने पळवून नेऊनही प्रशासन हातावर हात धरून आहे, तर दुसरीकडे वाळूसह इतर गौणखनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या माफियांकडून दंड वसुलीत प्रशासन ढिसाळ कारवाई करीत असल्याचे दिसते. चार महिन्यांत ११२ कारवायांमध्ये १ कोटी ७९ लाख पैकी फक्त ८८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात २ आरोपींना अटक केली. ८९ वाहने आणि १ यंत्रही जप्त करण्यात आले. सर्वाधिक ३१ कारवाया या अपर तहसील कार्यालयाच्या आहेत. १३ गुन्हे ९ तालुक्यांमध्ये दाखल नोंदविले आहेत.
वरिष्ठ कारवाई करतीलअवैध उत्खनन प्रकरणात कारवाईची जबाबदारी तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांची आहे. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक कारवाई होत नसेल, तर त्यांच्यावर वरिष्ठ कारवाई करतील.- किशोर घोडके, जिल्हा गौण खनिज अधिकारी
तालुका.......दंड.................................. वसूल.......गंगापूर.......... ७ लाख ५० हजार ........... ७ लाख ५० हजारवैजापूर.......... ७ लाख ८ हजार ...........२ लाख ७२ हजारछत्रपतीसंभाजीनगर...... ३६ लाख..३६ हजार ......२८ लाख १८ हजारअपर तहसील .....२४ लाख ८६ हजार..........१३ लाख १९ हजारखुलताबाद......... ३ लाख ५२ हजार............... १ लाख ३७ हजारकन्नड ..........२५ लाख०३ हजार................ ११ लाख ९ हजारसिल्लोड.......... ६ लाख ४१ हजार............ १ लाख ३९ हजार............फुलंब्री............ ९ लाख ७३ हजार.............. १ लाख ३० हजारपैठण ............५९ लाख १० हजार............ २२ लाख १३ हजार-------------------------------------------------------एकूण १ कोटी ७९ लाख ५९ हजार .................८८ लाख ५९ हजार