शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

भंडारदऱ्याची सहल ठरली काळरात्र; औरंगाबादच्या दोघांना ओढ्यात कारसह जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:54 AM

पेंडशेत जात असताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले होते. पुढे ओढ्याला पूर आलेला होता. हा ओढा कारमधील या तिघांना दिसला नाही. त्यांनी कार पाण्यात घातली व पुराच्या लोंढ्यात ते वाहून जाऊ लागले.

औरंगाबाद : भंडारदरा येथे सहलीसाठी गेलेल्या औरंगाबादेतील तीन वकिलांची कार ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने दोघांना जलसमाधी मिळाली. एकाने प्रसंगावधान राखून कारमधून उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला. कोल्हार घोटी (ता. अकोले, जि. अहमदनगर) रस्त्यावरील वारंघुशी ते पेंडशेतदरम्यान शुक्रवारी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली. घटनास्थळ दुर्गम असल्याने राजूर पोलिसांना तेथे पोहोचण्यास रात्री ११ वाजले होते. ॲड. आशिष प्रभाकर पालोदकर (३४, रा. पालोद, ता. सिल्लोड), रमाकांत प्रभाकर देशमुख (३४, रा. ताडपिंपळगाव, ता. कन्नड), अशी मृतांची नावे आहेत, तर ॲड. अनंता रामराव मगर (रा. शिंगी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हे यातून सुदैवाने बचावले. ॲड. आशिष पालोदकर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते प्रभाकर पालोकदर यांचे धाकटे चिरंजीव होत.

राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तीन पर्यटक भंडारदरा येथे कारने शुक्रवारी गेले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते वारंघुशी ते पेंडशेत जात असताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले होते. पुढे ओढ्याला पूर आलेला होता. हा ओढा कारमधील या तिघांना दिसला नाही. त्यांनी कार पाण्यात घातली व पुराच्या लोंढ्यात ते वाहून जाऊ लागले. प्रसंगावधान राखून ॲड. अनंता यांनी कारमधून उडी घेतल्याने ते वाचले, तर ॲड. आशिष आणि रमाकांत हे कारसह वाहून गेले. याच वेळी तेथून आणखी एक जण वाहून गेल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून काही अंतरावरच आशिष आणि रमाकांत यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. हे मृतदेह पोलिसांनी राजूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले.

आधार कार्डमुळे पटली ओळखपोलिसांना तेथे दोन मृतदेह आढळले होते. ॲड. अनंता हे मृत्यूच्या दाढेतून परत आल्याने ते प्रचंड घाबरले होते. त्यांना मृतांची नावेही सांगता येत नव्हती. पोलिसांना मृतांच्या पँटच्या खिशातील पाकिटात त्यांचे आधार कार्ड आढळले. या आधार कार्डांमुळे दोघांची ओळख पटविण्यात यश आल्याचे राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले.

ट्रॅक्टर- जेसीबीने ओढून काढली कारपर्यटकांसह कार ओढ्यात वाहून गेल्याचे कळताच प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि राजूर पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टरने ही कार ओढून बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कारमधील ॲड. आशिष आणि रमाकांतचे निधन झाले होते. ही कार बाहेर काढण्यासाठी सपोनि साबळे, कर्मचारी दिलीप डगळे, अशोक गाडे, अशोक काळे यांच्यासह प्रत्यक्षदर्शींनी मदत केली.

आशिष अविवाहित...अपघातात मृत्युमुखी पडलेले ॲड. आशिष पालोदकर हे अविवाहित आहेत. ते खडकेश्वर येथे आई, वडिलांसह राहत होते व जिल्हा कोर्टात वकिली करीत होते, तर रमाकांत देशमुख हे विवाहित असून शेती करायचे. त्यांना मुलगा, मुलगी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूtourismपर्यटन