शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

दोन गट आपसांत भिडले अन् पोलीस येताच पळून गेले; ४८ तासांत शहरातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 12:21 PM

प्रियदर्शनी उद्यानातील नियोजित बाळासाहेब ठाकरे स्मारकाजवळील घटना

औरंगाबाद : शहरात विविध भागांत जमाव जमवून एकामेकांवर लाठ्या-काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अहिल्याबाई होळकर चौकात दाेन गट भिडल्याच्या घटनेला ३६ तास होण्याच्या आत प्रियदर्शनी उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाजवळ दोन गट आपसांत भिडले. ही घटना शुक्रवारी (८ एप्रिल) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच दोन्ही गटांच्या तरुणांनी धूम ठोकली. या प्रकरणी सिडको ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

प्रियदर्शनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन गट आपसांत भिडले. सुरुवातीला दोन युवकांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यातील एकाने समर्थकांना बोलावून घेतले. काही वेळात १०० ते १५० युवक घटनास्थळी जमा झाले. रस्त्यावर दगड घेऊन एकमेकांना मारू लागले. यात एका युवकाचे डोके फुटले. दोन दुचाकींवरही दगडफेक करण्यात आली. एकाच बाजूचा जमाव अधिक असल्यामुळे दुचाकीवरील युवकाला दोन जण दांड्याने मारहाण करीत होते. स्मारकासमोरील रस्त्यावरून द्वारकादास श्यामकुमार या कपड्यांच्या शोरूमपर्यंत मारहाण करीत आणले. त्याचवेळी चिश्तिया चौकी येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती समजताच धाव घेतली. पोलिसांना पाहताच तरुणांनी घटनास्थळावरून पोबारा केला. दुचाकीवरील जखमी युवकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर काही वेळात सिडको निरीक्षक संभाजी पवार हे पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत जमाव पांगला होता. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून गोंधळ घालणारांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती निरीक्षक पवार यांनी दिली.

अन्नपूर्णा हॉटेलमध्ये टोळक्याची पोलीस पुत्राला मारहाणप्रियदर्शनी उद्यानातील हाणामारीची घटना घडल्यानंतर काही वेळातच याच परिसरातील अन्नपूर्णा हॉटेलमध्ये मोबाईलवर बोलण्यावरून एका टोळक्याने पोलीस अधिकाऱ्याच्या पुत्रास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या ठिकाणी निरीक्षक पवार यांनी भेट देत मारहाण झालेल्या युवकास तक्रार देण्याचा आग्रह केला. मात्र, त्याने नकार दिला. या ठिकाणी मारहाण करणाऱ्या आणि मार खाणाऱ्या अशा दोन्ही गटांतील युवकांनी मद्यप्राशन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

कोकणवाडी प्रकरणी पोलीस बघ्याच्या भूमिकेतकोकणवाडीतील आहिल्याबाई होळकर पुतळा परिसरात बुधवारी मध्यरात्री दोन गट आपसात भिडले होते. त्याठिकाणी दोन्ही बाजूंनी २०० पेक्षा अधिक युवक जमा झाले होते. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एमआयएम नेते अरुण बोर्डे आणि राजू आमराव गटात ही हाणामारी झाली होती. या घटनेनंतर दोन्ही गटांनी आपसात बसून मतभेद मिटविले. त्यामुळे पोलिसात कोणीही तक्रार देण्यास आला नाही. मात्र, किरकोळ ठिकाणी जमाव जमा झाल्यास पोलीस स्वत:हुन गुन्हे दाखल करतात. कोकणवाडीत मोठ्या प्रमाणात जमाव जमा होतो. हाणामारी करतो. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पोलिसांनी स्वत:हुन फिर्यादी होत गुन्हा नोंदवला नाही. एकूण प्रकरणात पोलिसांनी बघ्याची भूमिकाच घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद