औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतीगृहाजवळ मुलींची छेड काढून तसेच ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यास १९ ऑगस्ट रोजी गोगाबाबा टेकडी परिसरात मारहाण, डोक्यात दगड मारून जखमी करण्यात आले होते. या घटनेत मारहाण करणाऱ्या तिघांची ओळख पटवली असून दोघांच्या बेगमपुरा पोलीसांनी मुसक्या आवळल्या.
संदीप ज्योतीराम चव्हाण (३२, रा. गांधीनगर), विकी नरसिंह रिडलोन (३३, रा. गांधीनगर) असे अटकेतील तर हरिष अशोक चौधरी ( रा.बापूनगर) असे तिसऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, १९ ऑगस्टरोजी गोगाबाबा टेकडीजवळ मुलींची छेड काढण्यात येत होती. त्यावेळी त्या परिसरातून ग्रामीण पोलीस दलाचे सचिन मधुकर म्हस्के हे जात होते. मुलींनी सचिन यांना तिन चार मुले मारहाण करत असून दुचाकी त्यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यावर सचिन यांनी पोलीसांना ११२ नंबरवर फोन करून माहीती देण्याचे मुलींना सांगत असतांना तिन्ही आरोपींनी त्यांना हात चपाट्याने मारहाण केली.
पोलीसांना फोन करण्यास का सांगितले म्हणून डोक्यात दगड घालून जखमी केले. तेथून सुटका करून सचिन यांनी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. त्याप्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींच्या दुचाकी क्रमांक शोधून आरोपींचा शोध घेत संदिप आणि विकीला अटक करण्यात आली. आरोपी विकी रिडलाॅन विरोधात क्रांतीचाैक पोलीस ठाण्यात यापुर्वी पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटली असून तोही लवकरच अटक होईल. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली हैदर शेख यांच्यांसह पथकाने आरोपीची सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीची ओळख पटवून आरोपी शोधून ताब्यात घेतले आहे.