औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सवाचे अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्या हस्ते आज सकाळी उदघाटन झाले. कलाकारांनी फुललेल्या विद्यापीठात सकाळी नऊ वाजता शोभायात्रेने उत्सवाला वाय पाॅईंट येथून कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली.
महोत्सवात ३६ कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी सात रंगमंचावर सादरीकरण होणार आहे. कोरोनाचे परिणाम, शेतकरी समस्या, शिक्षण, बेरोजगारी, महागाई या विषयांकडे शोभयात्रेतून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. ज्ञानोबा माऊली तुकाराम...म्हणत ढोल ताशा, पारंपरिक वाद्याच्या गजरात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाच्या शोभायात्रेला सुरुवात झाली. कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी हिरवा झेंडा दाखवून शोभायात्रा उदघाटन होत असलेल्या रंगमंचाकडे निघाली. २३५ संघ या युवक महोत्सवात सहभागी झले आहेत. शोभायात्रेत २४ संघांनी सहभाग नोंदवला.लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप, प्र कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ भगवान साखळे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. संजय सांभाळकर, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
असे आहेत दिवसभरातील कार्यक्रम :
स्टेज क्र. १. सृजनरंगसकाळी ११ वाजता - उद्घाटन समारंभदु. २ ते सायं. ६ वाजेपर्यंत समूह व सुगम गायन
नाट्यगृहाशेजारी स्टेज क्र.२. लोकरंगदु. २ ते सायं. ५ वाजेपर्यंत - भजनदु. ५ ते रात्री १० वाजेपर्यंत - पोवाडा
विद्यापीठ नाट्यगृह, स्टेज क्र. ३. नाट्यरंग२ ते सायं. ४ वाजेपर्यंत - मूकअभिनयदु. ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत - एकांकिका
मानसशास्त्र विभाग, स्टेज क्र. ४. नादरंग२ ते सायं. ६.३० वाजेपर्यंत - शास्त्रीय तालवाद्यसायं. ६.३० ते रात्री. १० वाजेपर्यंत - शास्त्रीय सूरवाद्य
शिक्षक भवन शेजारी स्टेज क्र. ५. नटरंग२ ते दु. ४.३० वाजेपर्यंत - लोकगीतदु. ४.३० ते रात्री १० वाजेपर्यंत - लोकनाट्य
संस्कृत विभाग स्टेज क्र. ६. शब्दरंगदु. २ ते रात्री १० वाजेपर्यंत वक्तृत्व स्पर्धा
ललितकला विभाग, स्टेज क्र. ७. ललितरंगदु. २ ते दु. ४ वाजेपर्यंत - चित्रकलादु. ४ ते सायं. ७ वाजेपर्यंत - व्यंगचित्रकलादु. ७ ते रात्री १० वाजेपर्यंत - पोस्टर