- सुनील घोडकेखुलताबाद: मागील काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने राज्याची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटनस्थळे खुलली आहेत. दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे खुलताबाद , वेरूळ परिसरातील छोटेमोठे धबधबे वाहू लागले आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीचा धबधबा देखील जोरदारपणे कोसळू लागला आहे. पर्यटकांची मोठी गर्दी लेणी परिसरातील हा धबधबा बघण्यासाठी होत आहे.
खुलताबाद - वेरूळ परिसरात रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे डोंगरदऱ्यातील झरे, छोटे- मोठे धबधबे वाहू लागल्याने निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दौलताबाद, खुलताबाद, वेरूऴ, म्हैसमाऴ आदी ठिकाणी गर्दी पर्यटकांची गर्दी होत आहे.
वेरूऴचा धबधबा कोसळू लागलायंदा पाऊसच नसल्याने वेरूळलेणीचा धबधबा म्हणावा तसा कोसळत नव्हता. पंरतू रात्री झालेल्या पावसामुळे वेरूळ लेणीतील धबधबा सुरू झाला. जगप्रससिध्द लेणी पाहण्यासाठी सध्या गर्दी होत असून त्यातच वेरूऴलेणीचा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. या धबधब्यासोबत फोटोसेशन करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. तसेच म्हैसमाऴ परिसरात होत असलेल्या पावसात भिजण्यासाठी देखील पर्यटकांची गर्दी होत आहे.