शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

अंगावर गाडी, नंतर फरफटत नेले; वकिलाच्या कृत्याची घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 2:13 PM

अंगावर गाडी घातल्यामुळे फिर्यादी योगेश अहिरे (रा. महूनगर) हे जखमी झाले. वकील किरण  राजपूत (कुदळे) व त्यांचे सोबती गणेश साेनवणे यांच्यासह आणखी एकाचा आरोपींमध्ये समावेश आहे.

औरंगाबाद : किरकोळ वादातून एका वकिलाने भरधाव चारचाकी मजुराच्या अंगावर घातली. त्यानंतर खाली उतरून त्यास मारहाण केली.  याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पाच नातेवाइकांच्याही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच एकास काही अंतर फरफटत नेल्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला. या प्रकरणात मजुराच्या तक्रारीवरून वकिलासह इतर तीन जणांच्या विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

अंगावर गाडी घातल्यामुळे फिर्यादी योगेश अहिरे (रा. महूनगर) हे जखमी झाले. वकील किरण  राजपूत (कुदळे) व त्यांचे सोबती गणेश साेनवणे यांच्यासह आणखी एकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार बीड बायपासवरील ५० ग्रीन्स सोसायटीजवळ रविवारी दुपारी आरोपी किरण राजपूतने किरकोळ वादातून योगेश अहिरे यांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याचा जाब विचारताच राजपूत याने गाडी सुरू करीत पाच लोकांचा विचार न करता वेगात गाडी मागेपुढे केली. यात एकजण पाठीमागच्या दरवाजाजवळ होता. त्यास काही अंतर फरफटत नेल्याचा व्हिडीओ मंगळवारी व्हायरल झाला.  

पोलिसांनी गणेश सोनवणे यास अटक केली, तर किरण राजपूत याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे अटक केलेली नाही. दरम्यान, राजपूत याच्या कुटुंबीयांनीही सातारा पोलिस निरीक्षकांसह आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त बालाजी सोनटक्के यांची भेट घेत महूनगर येथील मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. 

प्रकरणाचा गुंता वाढला अंगावर गाडी घालणाऱ्या वकिलाने आपल्याला महूनगरच्या जमावाने मारहाण करीत चाकूने भोसकल्याचा दावा केला, तर महूनगरच्या एका गरोदर महिलेने वकिलाने जातीवाचक शिवीगाळ करीत पोटावर लाथ मारल्याचा दावा करीत ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. त्याशिवाय वकिलासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणतीही आपत्ती नसताना ११२ नंबरवर १५ वेळा फोन करून पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी