किरकोळ कारणावरून विटेने मारहाण
औरंगाबाद: हळदीच्या कार्यक्रमाला मुलाला सोबत येऊ न दिल्याच्या कारणावरून, मुलाच्या वडिलांना एका तरुणाने विटेने मारून जखमी केले. ही घटना २० फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता नक्षत्र पार्क येथे झाली. तक्रारदार महिलेच्या पतीने त्यांच्या मुलाला हळदीच्या कार्यक्रमासाठी जाण्यास मनाई केली होती. ही बाब रितेश सुरडकर या समजल्यानंतर, तो त्यांच्या घरी आला आणि त्यांच्याशी वाद घालून त्याने विट डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेनंतर तक्रारदार यांनी सातारा ठाण्यात रितेशविरुद्ध तक्रार नोंदविली.
बॅटरी चोरट्याविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : बीड बायपासवरील एका गॅरेजमध्ये उभ्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलासह तीन जणांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाली. विलास उत्तम बागुल उर्फ बोबडे दादा आणि दोन अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे. पोलिसांनी विलासला अटक केली. याविषयी जसपाल सिंग हिम्मत सिंग संधू यांनी सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.
चोरट्यांनी दूध डेअरी फोडली
औरंगाबाद : लोटाकारांजा तील लोकसेवा दूध डेअरीचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील २० हजार रुपये चोरून नेले. ही घटना शनिवारी रात्री घडली. याविषयी शेख जाकेर शेख अहमद यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
शिक्षकाची मोटारसायकल चोरली
औरंगाबाद: हर्सूल टी पॉइंटजवळील बीएसएनएल कार्यालयासमोर शिक्षकाने उभी करून ठेवलेली मोटारसायकल (क्रमांक एमएच२० सीपी २९८३)चोरट्यांनी पळविली. या घटनेविषयी दीपक उत्तमराव म्हस्के यांनी पोलिसात तक्रार नोंदविली.