पोलिसांनी सांगितले की, भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त एम.एच. वारसी हे कुटुंबासह सिडको एन-३ येथे राहतात. त्यांच्या बंगल्याच्या आवारातील सुमारे १५ वर्षे जुने चंदनाचे झाड चोरट्यांनी रात्री ३ ते ५ दरम्यान कापून नेले. ही घटना बुधवारी सकाळी वारसी कुटुंबाच्या नजरेस पडली. याविषयी वारसी यांचे सहकारी मुक्तेश्वर गौरीशंकर व्यास यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. सिडको एन-४ मधील रहिवासी एम.आर. गायकवाड यांच्या निवासस्थानाच्या आवारातील चंदनाचे झाड रात्री चोरट्यांनी तोडून नेले. याविषयी गायकवाड यांनी तक्रार नोंदविली.
पीएफ आयुक्तांच्या बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 7:26 AM