औरंगाबाद: दुसºयांच्या कागदपत्रांचा वापर करून त्याआधारे बँकेकडून क्रे डीट कार्ड मिळवत तिघांची ३ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, या फसवणूक करणाºया माजी बँक कर्मचाºयाला सिडको पोलिसांनी अटक केली. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. प्रितम सुरेश शर्मा (४८, रा. शहानुरवाडी, देवानगरी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. अर्पूवा अविनाश मानवतकर यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. जालना येथील गणेश विश्वनाथ खिचडे , देविदास भट्टाजी पवार आणि रेखा अजय पवार (सर्व रा. जालना) यांचे एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांच्या नावे असलेल्या क्रेडिट कार्डचे बील न भरल्यामुळे बँकेचे वसुली अधिकारी पंधरा दिवसांपूर्वी गणेश यांच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी बँकेकडून क्रेडीट कार्ड घेतलेच नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.त्यांच्याप्रमाणेच रेखा पवार आणि देविदास पवार यांच्या नावानेही कुणीतरी क्रेडीट कार्ड बनवून त्याचा परस्पर वापर करीत असल्याच्या तक्रारी सिडकोतील एसबीआयच्या कार्यालयास प्राप्त झाल्या. या तक्रारीची अनुषंगाने बँकेने मुंबई आणि पुणे येथी तक्रार निवारण अधिकाºयांमार्फत या तक्रारींची चौकशी करण्यात आली. तेव्हा तक्रारदारांची बनावट स्वाक्षरी करून त्यांच्या नावे क्रेडीट कार्डसाठी अर्ज करण्यात आल्याचे समोर आले. शिवाय अर्जावरील मोबाईल क्रमांकही तक्रारदारांचा नसल्याचे समोर आले.
मात्र त्यांच्या नावे क्रेडीट कार्ड घेणाºयाने त्या क्रेडीट कार्डवरून प्रितम शर्मा याच्या खात्यात पैसे वळते केल्याचे दिसून आले. प्रितमच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार फारूख नूर महंमद कुरेशी (रा.सिल्लेखाना) याने एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत केल्याचे बँक अधिकाºयांना समजले. अधिक चौकशीअंती आरोपी प्रितम शर्मा हा बँकेचा माजी कर्मचारी आहे. त्याला बॅकींग व्यवहाराची संपूर्ण माहिती असल्याने त्याने गणेश खिचडे, रेखा पवार आणि देवीदास पवार यांची कागदपत्रे मिळवून त्याआधारे त्यांच्या नावे बँकेकडून क्रेडीट कार्ड घेतले.
त्या कार्डचा वापर करीत आरोपींनी ३ लाख २६ हजार रुपयांची परस्पर खरेदी आणि पेटीएमद्वारे पैसे पाठवून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक भरत पाचोळे, जमादार नरसिंग पवार, राजू बनकर, प्रकाश डोंगरे, दिनेश बन, सुरेश भिसे यांनी आरोपीला अटक केली.