लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : साडेसात मिनिटे मुलीला सलाईन धरायला लावले, वरून छोटे स्टॅण्ड होते म्हणतात, मग छोट्या स्टॅण्डवर सलाईन का नाही लावले? तुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दांत शुक्रवारी (दि.२५) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचा-यांची कानउघाडणी केली. याप्रकरणी संबंधित दोषी कर्मचा-यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. लहाने पाहणीसाठी येणार असल्याने घाटी रुग्णालय प्रशासनाने सकाळपासूनच स्वच्छतेसह विविध खबरदारी घेण्यावर भर दिला. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास डॉ. लहाने यांचे आगमन झाले. बाह्यरुग्ण विभागातील नेत्र विभागापासून पाहणीला सुरुवात केली. विविध वॉर्ड, विभागांना भेट देऊन त्यांनी सुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के.यू. झिने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. मंगला बोरकर, डॉ. राहुल पांढरे, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. विकास राठोड आदींची उपस्थिती होती.यावेळी वॉर्ड क्रमांक-१९ मध्ये पोहोचल्यावर डॉ. लहाने यांनी पंधरा दिवसांपूर्वी वडिलांसाठी एका लहान मुलीला हातात सलाईनची बाटली धरण्याच्या ओढावलेल्या प्रसंगाचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी दोन मिनिटेच सलाईनची बाटली धरली होती, जवळ छोटे स्डॅण्ड होते, असे म्हणत अधिकारी- कर्मचा-यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; परंतु डॉ. लहाने यांनी अधिकारी, कर्मचा-यांना चांगलेच सुनावले. छोटे स्डॅण्ड होते, तर त्यावर सलाईनची बाटली का नाही लावली, सलाईनची बाटली मुलीच्या हातात का दिली, तुमची जबाबदारी नव्हती का, असे खडसावले. याप्रकरणी दोषी कर्मचा-यांवर कारवाई केली जाईल, नर्सिंग स्टाफ, कक्षसेवकांची ही जबाबदारी आहे, असे डॉ. लहाने यांनी पाहणीनंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.कर्मचाºयांनी मांडल्या समस्याप्रारंभी, बाह्यरुग्ण विभागात नेत्र, क्ष-किरण, शल्यचिकित्सा आदी विभागांची त्यांनी पाहणी केली. यानंतर सर्जिकल इमारतीतील विविध वॉर्डांची पाहणी केली. स्वयंपाकघरातील पदार्थांचाही त्यांनी आढावा घेतला. विविध वॉर्डांची पाहणी करताना घाटीतील कर्मचाºयांनी रुग्णालयात पाण्याची समस्या असल्याने गैरसोय असल्याचे नमूद केले. कर्मचारी संघटनांनी विविध मागण्याही मांडल्या.वैद्यकीय शिक्षण सहसंचालक यांच्याकडून विविध विभागांची पाहणीवॉर्ड क्रमांक १९ मध्ये पोहोचल्यावर डॉ. लहाने यांनी वडिलांसाठी एका लहान मुलीला हातात सलाईनची बाटली धरावी लागल्याच्या प्रकरणी अधिकारी-कर्मचाºयांची कानउघाडणी केली.वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी घाटी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आदी उपस्थित होते.डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून पाहणी सुरू असतानाही रुग्णांचे नातेवाईकच स्ट्रेचर ओढत असल्याचे दिसून आले. स्ट्रेचर नसल्याने रुग्णाला हलविण्यासाठी कसरत करावी लागल्याचे दिसले.साहेब, औषधी मिळत नाही४बाह्यरुग्ण विभागात डॉ. लहाने यांनी कडुबा दणके या रुग्णाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी दणके यांनी रुग्णालयात उपचार चांगले मिळतात; परंतु औषधी मिळत नाही, असे म्हटले. यावर डॉ. लहाने यांनी त्यांचे समाधान केले. एका वरिष्ठ अधिका-याने आपुलकीने साधलेल्या संवादाने उपस्थित रुग्णांनी समाधान व्यक्त केले.
मग...छोट्या स्टॅण्डवर सलाईन का नाही लावले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:11 AM
साडेसात मिनिटे मुलीला सलाईन धरायला लावले, वरून छोटे स्टॅण्ड होते म्हणतात, मग छोट्या स्टॅण्डवर सलाईन का नाही लावले? तुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दांत शुक्रवारी (दि.२५) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचा-यांची कानउघाडणी केली.
ठळक मुद्देसहसंचालक तात्याराव लहाने : अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुनावले, दोषींवर क रणार कारवाई; रुग्णालय प्रशासनाने सकाळपासून दिला स्वच्छतेवर भर