औरंगाबाद : मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ७५१ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. पावसाचे आगमन लांबण्याच्या शक्यतेमुळे चारा छावण्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. ११४८ छावण्यांना शासनाने मंजुरी दिली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात ६२ पैकी २७ छावण्या सुरू असून, त्यामध्ये २९ हजार ९२४ जनावरे आहेत. जालना जिल्ह्यात ४८ छावण्या मंजूर असून, ३२ सुरू आहेत. २२ हजार ३७३ जनावरे त्यात आहेत. बीड जिल्ह्यात ९३३ पैकी ६०२ छावण्यांमध्ये ४ लाख २ हजार ९२५ जनावरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात १०५ पैकी ९० चारा छावण्या सुरू आहेत. त्यात ७५ हजार ५५९ जनावरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा तालुक्यात सर्वाधिक ७० छावण्या सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील बीड, आष्टी, शिरूर कासार, पाटोदा, केज, वडवणी, गेवराईमध्ये ४०० च्या आसपास छावण्या सुरू आहेत. जालना तालुक्यात व अंबडमध्ये छावण्यांची संख्या जास्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमध्ये १४, वैजापूरमध्ये ११, सिल्लोडमध्ये १७ छावण्या सुरू आहेत. सर्व छावण्यांमध्ये ४ लाख ८५ हजार ११९ मोठी जनावरे, तर ४४ हजार ९५२ लहान जनावरे आहेत. एकूण जनावरांच्या तुलनेत फक्त ९ टक्के जनावरे छावण्यांमध्ये आहेत.मराठवाड्यात १.७२ टक्के पाणीमराठवाड्यातील सर्व लहान-मोठ्या मिळून ८७२ प्रकल्पांत १.७२ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत १.९४ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात १.२७ टक्के, तर ७४९ लघु प्रकल्पात १.६५ टक्के पाणी शिल्लक आहे. या उन्हाळ्यात आजवर मोठ्या प्रकल्पातील २.४६११ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.
मराठवाड्यात ७५१ चारा छावण्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 10:58 PM
मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ७५१ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. पावसाचे आगमन लांबण्याच्या शक्यतेमुळे चारा छावण्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. ११४८ छावण्यांना शासनाने मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देमान्सून कमिंग सून : ५ लाख ३० हजार ७१ जनावरांचा समावेश