‘गली गली में शोर हैं, सेना-भाजप चोर हैं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:06 AM2018-07-22T00:06:31+5:302018-07-22T00:07:15+5:30

‘गली गली में शोर हैं... सेना-भाजप चोर हैं, कहाँ गये भाई कहाँ गये... अच्छे दिन कहाँ गये, जनता के सम्मान में.... काँग्रेस मैदान में’अशा घोषणा देत शहर- जिल्हा काँग्रेसने आज काढलेली कचरा दिंडी लक्षवेधी ठरली

'There are noisy in the street street, army-BJP thieves' | ‘गली गली में शोर हैं, सेना-भाजप चोर हैं’

‘गली गली में शोर हैं, सेना-भाजप चोर हैं’

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादेत काँग्रेसची कचरा दिंडी : आठ दिवसांत कचरा उचला

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘गली गली में शोर हैं... सेना-भाजप चोर हैं, कहाँ गये भाई कहाँ गये... अच्छे दिन कहाँ गये, जनता के सम्मान में.... काँग्रेस मैदान में’अशा घोषणा देत शहर- जिल्हा काँग्रेसने आज काढलेली कचरा दिंडी लक्षवेधी ठरली. दिंडीत टाळ-मृदंगासह तीन ट्रॅक्टरमध्ये जनतेला कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.
शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार यांचे घणाघाती भाषण झाले. ‘मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळगा आणि राजीनामे देऊन मोकळे व्हा.
येत्या आठ दिवसांत शहरातील कचरा जर उचलला गेला नाही तर काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल’ असा इशारा पवार यांनी दिला. नंतर एका शिष्टमंडळाने मनपाच्या अतिरिक्त आयुक्त मंजूषा मुथा यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले. यावेळी माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, माजी अध्यक्षा रेखा जैस्वाल, मनपा गटनेते भाऊसाहेब जगताप पाटील, डॉ. पवन डोंगरे, बबन डिडोरे, इब्राहिमभय्या पटेल,किशोर तुळशीबागवाले, बाबा तायडे, पंकजा माने, इब्राहिम पठाण, मीर हिदायत अली, शेख रमजानी आदींचा समावेश होता.
यांचा सहभाग
मिलिंद पाटील, खालेद पठाण, जगन्नाथ काळे, पृथ्वीराज पवार, इक्बालसिंग गिल, नगरसेविका सायली जमादार, नगरसेवक अय्युब खान, नगरसेवक अब्दुल नईम अब्दुल रशीद, अश्फाक कुरेशी, सुनीता तायडे निंबाळकर, विजया भोसले, छाया मोडेकर, अनिता भंडारे, शेषराव तुपे पाटील, बाबूराव कावसकर, नायबराव दाभाडे, मोहंमद झाकेर, मोहंमद मुश्फीर, पुष्पा जगताप, वनिता राऊत, अंजली म्हस्के, अनिल मालोदे, मुद्दस्सर अन्सारी, अशोक डोळस, अंकुश चौधरी, पाटणी, शकुंतला पट्टेकर, किरण कांबळे, सचिन पवार, विजय काकडे, मोहंमद फारुक, अजीज खोकर, सय्यद रियाज, एम. ए. अजहर, अनिल जगताप, संकेत येवले, भाऊसाहेब भोळे आदींनी सहभाग घेतला
अन्यथा तीव्र आंदोलन करणार...
जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेने काही दिवसांपूर्वी कचरा टाकला होता. तसाच काही प्रकार घडतो की काय म्हणून मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा व मनपाच्या सुरक्षारक्षकांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. पण ट्रॅक्टरमधील कचरा मनपा प्रवेशद्वाराजवळ न टाकता कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: 'There are noisy in the street street, army-BJP thieves'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.