छत्रपती संभाजीनगर: शहानूरमिया दर्गा चौकात अतिक्रमण हटावची कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातील जेसीबीचा धक्का लागल्याने एमआयडीसीची ७०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी फुटल्याची घटना बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाण्याचे मोठा फवारा सुमारे २० ते २५ फुट उंच उडत होता. हे या घटनेमुळे चिकलठाणा एमआयडीसी आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींना पुढील २४ तास पाणी पुरवठा होणार नसल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ७००मी.मी. व्यासाची जूनी जलवाहिनी शहानूरमिया दगौ चौक मार्गे चिकलठाणा एमआयडीसीमध्ये जाते. या जलवाहिनीने चिकलठाणा औद्योगिक वसाहत आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना आणि नागरी वसाहतींना पाणी पुरवठा होतो. एवढेच नव्हे सिडको एन १ येथीलएमआयडीसीच्या जलकुंभ येथे महापालिकेचा टँकर पॉईंट आहे. या पॉईंटवर भरण्यात येणारी टँकर शहरातील विविध नागरी वसाहतींना पाणी पुरवठा होतो. अशा महत्वाची जलवाहिनी मंगळवारी सायंकाळी ४ वाजता मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकातील जेसीबीच्या धक्क्याने फुटली.