शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

फुलंब्री, गंगापूर, सोयगाव व खुलताबाद तालुक्यात परवानाधारक सावकार नाही, पिळवणूक थांबेना

By स. सो. खंडाळकर | Published: October 05, 2024 1:06 PM

फुलंब्री, गंगापूर, सोयगाव व खुलताबाद तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नाही; जिल्ह्यात परवानाधारक सावकर अवघे ११८

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या अवघी ११८ आहे. अवैध सावकारीचा व्याजदर मनमानी पद्धतीचा असतो. सावकारांवर कारवाया करण्याचे प्रमाण फारच अल्प आहे. 

सावकारांविरुद्ध तक्रार गेली की तिकडेच परस्पर मिटवून घेण्याचे प्रयत्न होतात. जिल्ह्यात नऊ पैकी फुलंब्री, गंगापूर, सोयगाव व खुलताबाद या तालुक्यांमध्ये आजघडीला एकही परवानाधारक सावकार नाही. तरी या तालुक्यांमधून सावकारांविरुद्ध शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करून जमिनी बळकावल्याच्या तक्रारी अधिक आहेत. मग जिल्हा उपनिबंधकांडून कठोर कारवाई का होत नाही, हा खरा प्रश्न आहे.

व्याज किती, कायदा काय सांगतो?शेतकऱ्यांसाठी तारणीवर ९ टक्के व बिगर तारणीवर १२ टक्के व्याजदर आहे. तर बिगर शेतकरी तारणीवर १५ टक्के व बिगर तारणीवर १८ टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर वार्षिक आहे.

११८ परवानाधारक सावकारनऊ तालुक्यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचच तालुक्यांत एकूण ११८ परवानाधारक सावकार आहेत. चार तालुक्यांत अवैध सवकारांचा सुळसुळाट चालूच आहे.

तीन हजार कर्जदारांची उचलले २५ कोटी

कोणत्या तालुक्यात किती सावकार?तालुका             परवानाधारक सावकारछत्रपती संभाजीनगर- १००वैजापूर- ३सिल्लोड- ३पैठण- ६कन्नड-६

फुलंब्री, सोयगाव, खुलताबाद या तालुक्यांमध्ये सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून एकही परवानाधारक सावकार नाही. गंगापूर तालुक्यात एक परवानाधारक सावकार होता. पण त्याचाही परवाना आता रद्द केला गेला.

आतापर्यंत किती तक्रारी आल्या?२०१४ साली कायदा अंमलात आल्यापासून जिल्ह्यात सावकारांविरुद्धच्या ५७० तक्रारी आल्या.

तालुकावार तक्रारी अशा :छत्रपती संभाजीनगर- २४२, वैजापूर- ३९, सिल्लोड- ७२, पैठण- ४५, कन्नड- ६१, सोयगाव- २१, फुलंब्री- १२, खुलताबाद- ७, गंगापूर- ७१

कारवाई काय झाली?तक्रारींची सुनावणी घेऊन आतापर्यंत शेतकऱ्यांना १०७ एकर २७ आर. शेती परत करण्यात आली. येत्या १५-२० दिवसांत आणखी काही शेती परत करण्यात येणार आहे.

सावकारांबाबत तक्रार कोठे कराल?जिल्हा उपनिबंधक कार्यालय, ते तालुका उपनिबंधक कार्यालय याठिकाणी तक्रारी करता येतात.

तक्रारीसाठी पुढे यासावकारांनी नियमात बसून सावकारी करावी. शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये व शेतकऱ्यांनीही पिळवणुकीबद्दल तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे.- जिल्हा उपनिबंधक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी