- बापू सोळुंकेऔरंगाबाद: डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने विधान परिषदेचे विरोधी पक्षानेते अंबादास दानवे संतप्त झाले आहे. कुलगुरू येवले यांच्या विरोधात कायदेशीर मार्गा हक्कभंग दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज शुक्रवारी सायंकाळी या पुतळ्याचा अनावरण समारंभ होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मात्र विधानपरिषदेचे विरोधीपक्षानेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव नाही. विद्यापीठ प्रशासनाच्या या कृतीमुळे दानवे हे संतप्त झाले आहेत. या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाने त्यांना रीतसर निमंत्रण दिले आहे. असे असले तरी दानवे यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. आणि आज सकाळी ते बुलढाणा च्या नियोजित दौऱ्यावर निघाले. याविषयी बोलताना दानवे म्हणाले की माझे नाव पत्रिकेत टाकू नये असे कुलगुरू ला कुणीतरी सांगितले असेल. मात्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संविधानिक पदावरील खासदार, आमदार यांची नावे पत्रिकेत टाकणे गरजेचे होते. मुद्दामहून नाव न टाकल्याने आपण कुलगुरु विरोधात कायदेशीर पद्धतीने विधानपरिषदे अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल करणार आहे. आज त्या कार्यक्रम ला जाणार नाही.शिवसैनिकासोबत जाईलआज जरी मी पुतळा अनावरण समारंभाला जाणार नसलो तरी छत्रपती आमचे दैवत आहे. यामुळे नंतर शिवसैनिकांना सोबत घेऊन जाईन आणि अभिवादन करणार आहे.