शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तणावाची स्थिती नाही, आजची रुग्णसंख्या महिनाभरात कमी होऊ शकते: अमित देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 7:20 PM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी पदभरती प्रक्रिया वेळेत राबवावी

औरंगाबाद :  मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा आकडा वाढलेला दिसत असला तरी रुग्णांमधील लक्षणे ही सौम्य प्रकारची आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेसारखी तणावाची स्थिती नाही. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे हे सुरक्षा कवच लाभलेले आहे. आजची रुग्णसंख्या ही महिनाभरात कमी होऊ शकते तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे तंतोतत पालन करण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील सभागृहात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना रुग्णसंख्या, सेवासुविधा व उपाय योजनाबाबतच्या आढावा बैठकीत मंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी बैठकीस औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार कल्याण काळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शंकर डांगे, जळगावचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, नंदूरबारचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, धुळ्याच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, लातूरचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, नांदेडचे अधिष्ठाता डॉ.पी.टी.जमदाडे, अंबाजोगाईचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पदभरती वेळेत करा मंत्री अमित देशमुख यांनी उपस्थित सर्व अधिष्ठातांद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या समस्या ऐकूण घेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने विविध सूचना दिल्या. त्याचबरोबर सर्व शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या फायर ऑडिटची माहिती त्यांनी यावेळी घेतली. तसेच विद्यार्थी व रुग्ण यांना सुविधा द्याव्यात. वैद्यकीय सेवा सुरळीतपणे प्रदान करण्याच्या दृष्टीने संबंधित महाविद्यालयांनी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी पदभरतीस ही शासनाने मंजूरी दिली असून संबंधित विभागांद्वारे पदभरती वेळेत करण्याच्या सूचनांही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी रुग्णांना औषधी खरेदी बाहेरुन करावी लागत असल्याबाबत लक्ष वेधले असता मंत्री देशमुख यांनी अधिष्ठांना औषधीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्याची सूचना केली.  

प्रस्तांवावर येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करता येईलऔरंगाबाद येथे फिजिओथेरेपी आणि ऑक्युपेश्नल अभ्यासक्रम  सुरू करणे, नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे नुतनीकरण, खेळाचे मैदान, वाहनतळाचे विस्तारीकरण, आदी सुविधांची मागणी असून ती पूर्ण करण्यात येईल. तसेच सर्व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आधुनिक यंत्रसामुग्री, विद्यार्थ्यांसाठी वाढीव वसतीगृहांच्या खोल्यांची संख्या, महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकांची व्यवस्था, आदी मागण्याही पूर्ण करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांनी त्यांना आवश्यक असलेल्या बाबींचा आराखडा तयार करुन परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावेत म्हणजेच या प्रस्तांवावर येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करता येईल असे ही ते म्हणाले. 

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद