हिंगोली : जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया गुरूवार पासून सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी तिन्ही ठिकाणी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही.हिंगोली, कळमनुरी व वसमत या तिन्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचा निवडणुक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. नगराध्यक्षपदासाठी १० व ११ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करावयाचे आहेत. त्यानंतर ११ रोजी सायंकाळी ५ पर्यंत आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर लागलीच पात्र अर्जांची यादी नगरपालिकेत लावण्यात येणार आहे. फेटाळण्यात आलेल्या अर्जांवर ११ ते १४ जुलै दरम्यान सुनावणी होणार आहे. त्यानंतर वैद्य अर्जांची यादी १४ रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी परत घेता येणार आहे. त्यानंतर ४.३० वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी तिन्ही ठिकाणी विशेष सभा घेवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पिटासन अधिकारी म्हणून हिंगोली करीता उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, वसमतसाठी अनुराधा ढालकरी व कळमनुरीसाठी उपजिल्हाधिकारी एम. बी. निलावाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवारानी तिन्ही ठिकाणी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे आता शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)उपनगराध्यक्षांची १५ रोजी निवडणूकतिन्ही पालिकांमधील उपनगराध्यक्षांची १५ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळात नामनिर्देशन पत्र देण्यात व स्विकारण्यात येणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी होवून उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
By admin | Published: July 11, 2014 12:08 AM