लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून आधीच्या वर्षातील अनुत्तीर्ण विषयांसह परीक्षा देण्यासाठी कॅरिआॅन देण्याची मागणी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने शनिवारी (दि.१५) फेटाळली.कॅरिआॅनच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची खास बैठक शनिवारी बोलावण्यात आली होती. परिषदेने कॅरिआॅनसह औषधनिर्माणशास्त्र, विधि शाखेच्या विद्यार्थ्यांचीही मागणी धुडकावून लावली. गुणवत्तेसाठी यापुढे कोणत्याही अभ्यासक्रमांना कॅरिआॅन दिला जाणार नाही, असा ठरावही बैठकीत मंजूर केला. अभियांत्रिकी विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्याकडे कॅरिआॅन देण्याची मागणी केली होती. तृतीय वर्षात अनुत्तीर्ण झालेले किंवा कॅरिआॅन मिळालेले वा तृतीय वर्षाचे सत्र पूर्ण केलेल्या आणि द्वितीय वर्षात अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना चतुर्थ वर्षांचे शैक्षणिक सत्र पूर्ण करण्याची परवानगी देण्याची मागणी होती. यासाठी विद्यार्थ्यांनी निदर्शनेही केली. यावर विद्यापीठाने हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्याचा निर्णय घेतला होता.कॅरिआॅन घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. व्यवस्थापन परिषदेने घेतलेला निर्णय अमान्य आहे. त्यामुळे मंगळवारपासून आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा अभियांत्रिकी विद्यार्थी कृती समितीचे समन्वयक मुकुल निकाळजे यांनी केली.वसतिगृहात सर्वांना समान पाणी द्याविद्यार्थिनी वसतिगृहात पाणी प्रश्नावर चर्चा झाली. गुरुवारी मध्यरात्री विद्यार्थिनींनी आंदोलन केले. विद्यापीठात मुबलक पाणी असताना कृत्रिम पाणीटंचाई का निर्माण केली जाते? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे यापुढे वसतिगृहांना समान पाणी वितरण झाले नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
अभियांत्रिकीला कॅरिआॅन नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:12 AM
अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना शेवटची संधी म्हणून आधीच्या वर्षातील अनुत्तीर्ण विषयांसह परीक्षा देण्यासाठी कॅरिआॅन देण्याची मागणी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने शनिवारी (दि.१५) फेटाळली.
ठळक मुद्देविद्यापीठ : व्यवस्थापन परिषदेच्या बैैठकीत निर्णय; यापुढे कॅरिआॅन बंदचा ठराव