शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

संविधानाला कुठलाही धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:52 AM

कुणाच्या ‘स्वीट चॉइस’वरसुद्धा संविधानात दुरुस्ती होऊ शकत नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘या देशाच्या संविधानाला कुठलाही धोका नाही. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर हे संविधान आधारलेले आहे. ही पायाभरणी इतकी भक्कम आहे की, कुणाच्या ‘स्वीट चॉइस’वरसुद्धा संविधानात दुरुस्ती होऊ शकत नाही,’ असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एल. आचलिया यांनी केले.ते दुपारी तापडिया नाट्यमंदिरात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर्स लॉयर डे सेलिब्रेशन’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील होते. माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत.अर्थशास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, मुंबई- गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. व्ही.डी. साळुंके, ज्येष्ठ विधिज्ञ नानासाहेब शिंदे, अ‍ॅड. प्रल्हाद खंडागळे पाटील आदींची यावेळी भाषणे झाली. प्रारंभी, पाहुण्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. एस.आर. बोदडे यांनी प्रास्ताविक केले. ५ जुलै १९२३ रोजी बाबासाहेबांनी वकिली सुरू केली, तो दिवस गेल्या पाच वर्षांपासून आपण ‘लॉयर डे’ म्हणून साजरा करीत आहोत, असे बोदडे यांनी सांगितले.मराठा मोर्चे संघ पुरस्कृतअलीकडेच निघालेले मराठा मोर्चे हे राष्टÑीय स्वयंसेवक संघाने आयोजित केले होते, असा सनसनाटी आरोप करून कोळसे पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. मराठ्यांच्या जीवनात एवढ्या चांगल्या गोष्टी कधी घडत नाहीत, अशी टिपणीही त्यांनी केली. संभाजी महाराजांना जाळायला महारांनी जागा दिली होती. त्यावरून तुमचं आमचं नातं काय हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.बाबासाहेबांचे मोठे योगदानन्या. व्ही.एल. आचलिया यांनी सांगितले की, भारताच्या नवनिर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. सामाजिक गुलामगिरीतून या देशाला मुक्त करण्याचे त्यांनी केलेले कार्यही अविस्मरणीय आहे. मीसुद्धा एका शेतकरी कुटुंबातून इथपर्यंत आलो. यामागे बाबासाहेबांचीच प्रेरणा आहे. आजच्या दिनी आपण बाबासाहेबांच्या मार्गाने जात आहोत की नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.सुदैव आणि दुर्दैवडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशात जन्माला आले, हे या देशाचे सुदैव होय, तर बाहेरच्या देशांना ते कळले; पण आपल्या देशाला ते अद्यापही समजले नाहीत, हे दुर्दैव होय, अशी खंत भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी व्यक्त केली. या देशाने मानसिक आणि भावनिक पातळीवर स्वीकारलेले नाही. कारण या देशाच्या मनातून जातीचा शूद्र विचार यत्किंचितही गेलेला नाही, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.