शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

दहा वर्षांमध्ये एकही पिसाळलेला कुत्रा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:39 AM

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या एक लाखाहून अधिक असली तरी मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेला एकही पिसाळलेला कुत्रा आढळला नाही. पिसाळलेल्या कुत्र्यांना मारण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र समिती नेमलेली आहे. या समितीची एकही बैठक घेण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे अहो आश्चर्यम : कुत्रे मारण्यासाठी नेमलेल्या समितीची बैठकच नाही

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या एक लाखाहून अधिक असली तरी मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेला एकही पिसाळलेला कुत्रा आढळला नाही. पिसाळलेल्या कुत्र्यांना मारण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र समिती नेमलेली आहे. या समितीची एकही बैठक घेण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी बारूदगरनाला येथील नूर पिंजारी या नऊवर्षीय मुलाचा रेबिजने मृत्यू झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेवर टीकेची प्रचंड झोड उठलेली असतानाही प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही. बुधवारी कुत्र्यांवर नसबंदी करणाऱ्या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.शहरात मोकाट कुत्रे नेमके किती आहेत, याचा कोणाताही सर्व्हे महापालिकेने आजपर्यंत केलेला नाही. निव्वळ मोघम स्वरूपात आकडेवारी सांगण्यात येते. ४० ते ४५ हजार मोकाट कुत्रे असावेत, असे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून सांगण्यात येत आहे. बारूदगरनाला येथील नऊवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शहर स्मार्ट करण्यासाठी महापालिका जोरदार प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे शहरात राहणारे नागरिक स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. मंगळवारी नूर पिंजारीचा बळी गेला. उद्या आणखी कोणाचाही जाऊ शकतो. या गंभीर प्रश्नाकडे मनपा प्रशसन, पदाधिकारी अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत.शहरातील विविध वसाहतींमध्ये आजही गंभीर आजारी, पिसाळलेले कुत्रे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. महापालिकेच्या यंत्रणेला एकही पिसाळलेला कुत्रा दहा वर्षांमध्ये सापडला नाही, म्हणजे आश्चर्य म्हणावे लागेल. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कुत्र्यांच्या नसबंदी कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी एकाही पिसाळलेल्या कुत्र्याला मारले नसल्याची माहिती समोर आली. पिसाळलेले कुत्रे शोधा समितीसमोर निर्णय घेऊन त्यांना मारण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करा, असे आदेश त्यांनी दिले.कुत्र्यांच्या टोळ्या कुठे जास्त?मोकाट कुत्र्यांना खाण्यासाठी जिथे मिळेल तेथे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. मध्यवर्ती जकात नाका, जळगाव रोड, टाऊन हॉल, बुढीलेन, औरंगपुरा, एन- ११ टीव्ही सेंटर रोड, जटवाडा रोड, रामगिरी चौक, विठ्ठलनगर, क्रांतीचौक अशा अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. महापालिकेने आजपर्यंत असे स्पॉटही शोधून काढलेले नाहीत. मांस विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी टाकलेल्या खरकट्यावर हे कुत्रे वर्षानुवर्षे जगत आहेत. महापालिका त्यादृष्टीनेही ठोस पाऊल उचलत नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाdogकुत्रा