शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

कचरा डेपो हटविल्याशिवाय माघार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:29 AM

आता डेपो हटविल्याशिवाय माघार नाही. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मनपाची वाहने डेपोत जाऊ देणार नाहीत, असा एल्गार मांडकीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी पुकारला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मांडकीची ४४ एकर गायरान जमीन कचरा डेपोसाठी मनपाने घेऊन पंचक्रोशीत अस्वच्छता पसरविली आहे. डेपो हटविण्याच्या हालचालीला हेतुपुरस्सर ब्रेक दिला जात आहे. आता डेपो हटविल्याशिवाय माघार नाही. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून मनपाची वाहने डेपोत जाऊ देणार नाहीत, असा एल्गार मांडकीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी पुकारला आहे, असे पत्रकार परिषेदत पुंडलिकराव अंभोरे, डॉ. विजय डक, मनोज गायके यांनी सांगितले.१९८३-८४ पासून ४४ एकर गायरान जमिनीवर कचरा डेपो सुरू केला. सुरुवातीला अनेक शेतक-यांनी डेपोतून कुजलेला कचरा खत म्हणून उचलूनदेखील नेला; परंतु ३५ वर्षांपासून या डेपोतील विदारक परिस्थिती व मरणयातना शेतकरी व नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. दोन वेळा कच-यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न फक्त केंद्र शासनाचे अनुदान लाटण्यासाठी झाला. खतनिर्मिती, गॅसनिर्मिती अशी मोठी आश्वासने दाखवून जनतेला पुन्हा प्रदूषणात झोकून दिले आहे. किरकोळ वाटणाºया डेपोत ३५ वर्षांत ६० फूट उंचीचा कच-याचा डोंगर उभा राहिला असून, त्याला हटविण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणार होत असून, वायू, जल प्रदूषण झाल्याने खेड्यातील नागरिकांना डोकेदुखी, त्वचारोगाचे आजार आढळून येत आहेत. मनपाने एकदाही आरोग्यसेवा किंवा शेजारच्या खेड्यात जनतेला सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला नाही. रस्त्याविषयी विचारले असता तो आमच्या हद्दीत येत नाही असा बहाणा मात्र केला जातो. कचरा डेपो आमच्या हद्दीत मग कशाला टाकता. तो त्वरित हटवावा, आता माघार नाही, असा निर्धार पुंडलिकराव अंभोरे, डॉ. विजय डक यांनी केला आहे.जोपर्यंत डेपो हलविणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. गुन्हे दाखल करा अन्यथा तुरंगात पाठवा, मनपाच्या ढिसाळपणाला वठणीवर आणणारच, असा इशारा उपसरपंच साईनाथ चौथे, मदन डक, जगदीश चक्कर, रियाज शाह, विष्णू भेसर, संतोष डक, सय्यद पटेल, उपसरपंच अनिल हिवर्डे, रतन काळे, भाऊसाहेब गायके आदींनी दिला आहे.