नाचनवेल : आडगाव (पिशोर) येथील शेतकरी समाधान भोसले यांचा चार महिन्यांपूर्वी पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात आली. मदतीचा धनादेश आ. उदयसिंग राजपूत व तहसीलदार संजय वरकड यांच्या हस्ते मयताच्या पत्नी अरुणा भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
मयत समाधान भोसले हे सासुरवाडीला जात असताना भोकरदन तालुक्यातील केळणा नदीच्या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रात वाहून गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांना मदत धनादेश प्रदान करताना नायब तहसीलदार स्वप्नील खुल्लम, हारुण शेख, मंडळ अधिकारी विलास जोशी, तलाठी नारायण पठ्ठे व जितेंद्र साळुंखे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
आडगाव (पिशोर) पुराच्या पाण्यात मृत्यू पावलेल्या समाधान भोसले यांच्या पत्नीला आमदार उदयसिंग राजपूत व तहसीलदार संजय वरकड यांच्या हस्ते मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.