शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

किराडपुऱ्यातील राममंदिर परिसरात तब्बल १९ तास वीज गूल; पिण्याचे पाणीही भरता आले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:48 IST

सोमवारी रात्री ८ वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता आली

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा येथील राममंदिरातील विद्युत रोहित्र सोमवारी रात्री ८ वाजता जळाले. यामुळे बारी कॉलनी, रहीमनगर, किराडपुरा, शरीफ कॉलनी परिसरात तब्बल १९ तास ४० मिनिटे वीजपुरवठा बंद होता. नागरिकांना पिण्याचे पाणीही भरता आले नाही. लहान-मोठे व्यवसाय बंद होते. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

सोमवारी रात्री ८ वाजता अचानक विजेचा दाब वाढल्याने राममंदिरातील विद्युत रोहित्र जळाले. ही माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत दुरुस्ती सुरू केली. रात्री दीडच्या सुमारास दुरुस्ती झाल्यानंतर रोहित्र सुरू केले. मात्र, ते पुन्हा जळाले. दुरुस्ती व नवीन रोहित्र बसविण्याचे काम मंगळवारी दिवसभर चालले. अखेर दुपारी ३.४० वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. यादरम्यान रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडितपावसाळा सुरु झाल्यापासून नक्षत्रवाडी, इटखेडा, सुधाकरनगर, वाल्मी परिसर, छावणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भाग, हर्सूल, रामनगर, मुकुंदवाडी, नारेगाव, चिकलठाणा, गारखेडा तसेच सिडको-हडकोत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे.

आम्ही तीन रोहित्र बदललेविजेचा दाब वाढल्याने रोहित्र नादुरुस्त झाला. रात्री १० ते ११ वाजेदरम्यान नवीन रोहित्र आणून बसवले. तेही बिघडले. अखेर तिसरा रोहित्र आणून बसवला. नंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू केला.- अभय अरणकल्ले, सहायक अभियंता, नवाबपुरा विभाग

सणांत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्नदिवाळी सणात वीजपुरवठा बंद होवू नये म्हणून आमची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmahavitaranमहावितरण