रिक्षा थांबा देण्याची मागणी
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावर रिक्षांसाठी अधिकृत थांबा दिलेला नाही. त्यामुळे रिक्षा चालकांवर कारवाई केल्या जाते. त्यामुळे विमानतळावर परवानाधारक रिक्षा चालकांना अधिकृत थांबा देण्याची मागणी रिक्षाचालक संघटनांतर्फे प्राधिकरण समिती, तसेच विमानतळ प्राधिकरणाकडे केली आहे, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष निसार अहेमद खान, कैलास शिंदे, रमाकांत जोशी, एस.के. खलील, शकील पटेल आदींनी दिला आहे.
परभणीची एसटी सेवा विस्कळीत
औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परभणी जिल्ह्यात एसटी बससेवा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आला. परिणामी, औरंगाबादहून परभणी मार्गावरील बससेवा विस्कळीत झाली आहे. याबरोबर नांदेड मार्गावरील एसटी सेेववरही परिणाम झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रिक्षात तीन प्रवासी नेण्याची परवानगी देण्याची मागणी
औरंगाबाद : स्मार्ट सिटी बसमधून २५ ते ३० प्रवासी नेण्याची परवानगी आहे, परंतु कोरोनामुळे रिक्षातून केवळ दोन प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. रिक्षातून किमान तीन प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे कृती समितीचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी प्राधिकरण समितीकडे केली आहे.