विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जालना रोडवर नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) फक्त दोन उड्डाणपूल बांधणे प्रस्तावित केले असून, त्या पुलांचे स्थळ कुठे असावे, यासाठी विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना एनएचएआयने पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढच्या आठवड्यात याबाबत संयुक्त बैठक होईल. त्यानंतर दोन पूल कुठे बांधायचे, याबाबत निर्णय होणे शक्य आहे.एनएचएआयने मध्यंतरी मुख्यालयाला सादर केलेल्या डीपीआरमध्ये जालना रोडवरील उड्डाणपुलांची संख्या ५ वरून ३ करीत भुयारीमार्ग वाढविले. महावीर चौक, आकाशवाणी, रामनगर, अमरप्रीत चौक येथे भुयारीमार्ग, तर चिकलठाणा, विमानतळ आणि केम्ब्रिज शाळेजवळ उड्डापणपूल प्रस्तावित केले. या आराखड्यानुसार काम होणे आता शक्य नाही.जालना रोडचे फक्त रुंदीकरण करण्याचा विचार सध्या सुरू आहे. पूर्वीच्या डीपीआरनुसार मुकुंदवाडी आणि चिकलठाणा येथील उड्डाणपूल होणे शक्य नाही. फक्त दोन उड्डाणपुलांच्या जागा निश्चित करण्यासाठी एनएचएआयने स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली आहे. जालना रोडवरील भुयारी मार्गाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले .
जालना रोडवर होणार फक्त दोन उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 1:42 AM