शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मिनी राळेगणसिद्धी म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेल्या थेरगावने परिवर्तनाचा नवा आदर्श निर्माण केला असून, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता ग्रामस्पर्धेत भाग घेऊन १०० टक्के शौचालय बांधकाम करीत परिवर्तनवादी विचाराने थेरगाव ऐवजी ‘थोरगाव’ बनणार असून, नावात आणि गावात बदल करून खऱ्या अर्थाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे़ प्रत्येक गावाला गावाच्या नावाचा ऐतिहासिक वारसा असतो, तसा थेरगावलासुद्धा थोरगावच्या ऐतिहासिक वारसा होता़ परंतू, कालौघात अपभ्रंश होऊन थोरगावचे थेरगाव बनले, परंतू, थेरगावच्या ग्रमस्थांनी चार पाच महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांच्या उपस्थितीत १०० टक्के शौचालय बांधून थेरगावचे थोरगाव करणार असा संकल्प केला आणि या संकल्पाला मुर्त स्वरूप देण्यासाठी पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, मोहन अभंगे, बालाजी पोतदार, स्वयंप्रकाश गोस्वामी, समन्वयक बालाजी गव्हाणे यांनी मोठा पाठपुरावा केला़ त्यास सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामस्थ तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव पेठे यांनी मोलाची साथ दिली आणि जवळपास १०० टक्के शौचालय बांधकाम पूर्ण झाले़ अवघ्या दहा-पंधरा घरातील शौचालयाचे किरकोळ काम राहिले आहे़ तेसुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे़ त्यामुळे थेरगाव पुन्हा एकदा ‘थोरगाव’च्या उंबरठ्यावर उभारले आहे़ (वार्ताहर)४दरम्यान, थेरगावचे ‘थोरगाव’ असे नामकरण करण्यासाठी गॅसेटमध्ये बदल करून, ‘थोरगाव’ असा बदल लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, असेही गटविकास अधिकारी मुक्कावर अभंगे यांनी सांगितले़ शिवाय, तालुक्यातील बाकली, साकोळ, येरोळ, शिरूर अनंतपाळ, वांजरवाडा, हालकी, उजेड येथेही परिवर्तनाची नवी पायवाट सुरु असून, तेथेही लवकरच शौचालयाचे बांधकाम पूर्ण होणार आहेत़
थेरगाव ‘थोरगाव’च्या उंबरठ्यावऱ़़
By admin | Published: August 27, 2014 12:44 AM