जिल्ह्याचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे, ते मुंबईकर मंत्री येतात आणि जातात. त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे काय चालले आहे, कार्यकर्ते कसे आहेत, त्यांना कोरोनाच्या काळात उत्पादनाचे काही साधन आहे की नाही, याबाबत त्यांनी आजवर काहीही विचारणा केली नाही. त्यामुळे यांच्यापेक्षा जुने मुंबईकर मंत्री बरे होते, अशी कुजबुज सध्या कार्यकर्त्यांत सुरू आहे. सध्याचे जबाबदार मुंबईकर शहरात आले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून निघून जातात. सामान्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते भेटत नसल्यामुळे पक्षामध्ये नाराजी वाढते आहे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ते भेटतच नाहीत, जनसामान्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी त्यांनी या दोन वर्षांत एकदाही वेळ दिला नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपासून माध्यमांना दूर ठेवतात. आजवर एकाही बैठकीमध्ये त्यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रवेश दिला नाही. यापूर्वीच्या मुंबईकर मंत्र्यांनी माध्यमे, कार्यकर्ते, पदाधिकारी, जनसामान्यांना कधीच डावलले नव्हते, अशीही कुजबुज आहे.
ते येतात आणि जातात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:02 AM