शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
3
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
4
'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी
5
'सिकंदर' सलमान खानचं 'किक' फोटोशूट! भाईजानने हटके पद्धतीने केली 'Kick 2'ची घोषणा
6
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
7
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
8
'बाप-लेकी'च्या भेटीवर हसीन जहाँची तिखट प्रतिक्रिया; शमीवर आरोप करत म्हणाली...
9
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
10
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
11
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
12
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
13
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
14
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
15
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
16
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
17
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
18
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
19
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
20
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत

'मला 'ते' सतत डावलत असतात'; अंबादास दानवेंच्या मनातील खदखद बाहेर, पक्षांतरावर म्हणाले...

By बापू सोळुंके | Published: March 16, 2024 11:50 AM

आपण नाराज नाही आणि शिंदे गटात जाणार नसल्याचे दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरः चंद्रकांत खैरे हे नेहमीच आपल्याला डावलतात. आपण त्यांच्याकडे पाहून नाही तर उद्धव साहेबांसाठी पक्षाचे काम करीत असल्याचे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना येथे केले. आपण नाराज नाही आणि शिंदे गटात जाणार नसल्याचे दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. दानवे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त लोकमतने आज प्रकाशित करतात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुंबईहून शहरात परतलेल्या दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मागील दहा वर्षापासून आपण औरंगाबाद लोकसभेसाठी (छत्रपती संभाजी नगर )साठी इच्छुक आहोत. उमेदवार बदला असे आपण पक्षप्रमुखांना सांगितलं आहे. चंद्रकांत खैरे यांचा या निवडणुकीत पराभव होऊ शकतो. यामुळे तसे झाल्यास पुन्हा अंबादास मुळे पराभव झाला असा ठपका ठेवल्या जाऊ नये यासाठी आपण पक्षप्रमुखांना उमेदवार बदलण्याची विनंती केली आहे. पक्षप्रमुखांनी अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नाही. चंद्रकांत खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात. परवा झालेल्या स्तंभ पूजन कार्यक्रमाची आपल्याला माहिती देण्यात आली नव्हती ,असे सांगून दानवे यांनी त्यांच्या मनातली नाराजी बोलून दाखविली.

शिंदे सेना पक्ष केवळ केवळ पाच दिवसांचा निवडणुकीच्या तोंडावर आपण शिंदे गटात प्रवेश करणार, अशा बातम्या येत राहतात मात्र यात काही तथ्य नाही शिंदे शिवसेना पाच दिवसासाठीच आहे. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा दावाही दानवे यांनी केला.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद